चुनवरे येथील कै वसुंधरा वसंत परब यांच्या स्मरणार्थ चुनवरे पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांचे वाटप

संतोष हिवाळेकर पोईप
नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था पालघर जिल्हा संघटक आदरणीय डॉ मंगला परब मॅडम तसेच मराठा समाज मुंबई पालघर जिल्ह्याच्या संघटक यांनी गौरी गणपतीदिनानिमित्त आपल्या गावच्या जिल्हा परिषद शाळेतील मुलांना आपल्या राहते घरी गणेश उत्सवानिमित्त व आपली आई कैलासवासी वसुंधरा वसंत परब यांच्या पुण्यस्मरण निमित्त शैक्षणिक साहित्य वाटप केले
यावेळी आदरणीय दक्षता परब मॅडम कवल परब ,गावातील ज्येष्ठ नागरिक तसेच महिला उपस्थित होत्या
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी शिक्षण सर्वात महत्त्वाचा गाभा आहे यावर आदरणीय डॉक्टर मंगला परब मॅडम यांनी विद्यार्थ्यांना पालकांना मार्गदर्शन केलं आपल्या समाजासाठी त्या नेहमीच पुढे असतात विद्यार्थ्यांना विकास पाहिजे असेल तर शिक्षण सगळ्यात महत्त्वाचे आहे आणि म्हणून त्यांनी हा शिक्षण विषय घेऊन या शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले
यावेळी सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान पोईप गावचे समाज सेवक गोपीनाथ पालव यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला यावेळी बोलताना गोपीनाथ पालव म्हणाले की कै वसुंधरा वसंत परब हि माझी मोठी बहीण असुन तिने गरीब जीवन जगवत आपल्या सर्व मुलांना उच्च शिक्षण व संस्कार दिले आज आपली भाची मंगला परब हिने दाखविलेल्या कर्तबगारी कर्तृत्ववाचा अभिमान असल्याचे गौरवोद्गार काढले
सदर कार्यक्रमास वसंत परब,प्रभाकर परब, राकेश परब, बबन परब, सुभाष तळेकर, गोपाळ परब व ग्रामस्थ,पालक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते