सरत्या वर्षांला निरोप आणि  नवीन वर्ष स्वागत करण्यासाठी रोटरी क्लब ऑफ कुडाळच्या रोटरी महोत्सवाचे उद्घाटन कुडाळ हायस्कूल मैदानावर 

जिल्हाधिकारी तृप्ती घोडमिसे यांच्या हस्ते विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत दिमाखात झाले उद्घाटन

रोटरी क्लब ऑफ कुडाळ आयोजित रोटरी महोत्सव 2025 चे आयोजन कालपासून 29, 30 व 31 डिसेंबर रोजी कुडाळ हायस्कूल मैदानवर  करण्यात आले आहे. या महोत्सवात इंडस्ट्रियल, फूड व ऑटो एक्स्पो चे विविध स्टाॅलची पर्वणी सिंधुदुर्ग वासियांना मिळणार आहे. विविध सांस्कृतिक कार्यक्रमांच्या आयोजनासह  या फेस्टीव्हल मध्ये विविध इंडस्ट्रियल, फूड व ऑटो एक्स्पो मध्ये नामांकित कंपन्याचे 89 स्टॉल सहभागी झाले. उद्घाटन प्रसंगी प्रांताधिकारी ऐश्वर्या काळुसे तहसीलदार सचिन पाटील पीडीजी रोटरी डिस्ट्रीक्ट 3170 रो. संग्राम पाटील  नायब तहसीलदार अमरसिंह जाधव असिस्टंट गव्हर्नर, रो. डॉ. प्रशांत कोलते  अध्यक्ष रोटरी क्लब ऑफ कुडाळ रो. राजीव पवार सचिव रो. मकरंद नाईक अध्यक्ष रोटरी सेवा प्रतिष्ठान रो. अॅड. राजीव बिले कार्यक्रम प्रमुख रोटरी महोत्सव रो. सचिन मदने गजानन कांदळगावकर डॉ. संजय केसरे डॉ. संजय सावंत शशिकांत चव्हाण संगीतकार विजय गवंडे का आ सामंत, अरविंद शिरसाट नकुल पार्सेकर दिनेश आजगावकर प्रफुल्ल वालावलकर सायली प्रभू मानसी जोशी, पद्मा वेंगुर्लेकर नीता गोवेकर, राजन बोभाटे, अमित वळंजू,, रुपेश तेली, प्रमोद भोगटे, गीतांजली कांदळगावकर, अभिषेक माने, आरोही माने, इनरव्हील क्लब ऑफ कुडाळ, रोट्रॅक्ट क्लब ऑफ कुडाळ, इंटरॅक्ट क्लब ऑफ कुडाळ तसेच राज्यभरातील विविध स्टॉलचे प्रतिनिधी यांची उपस्थिती होती महोत्सवाची सुरुवात फॅन्सी ड्रेस स्पर्धेने झाली
     आज 30 डिसेंबर रोजी 65 कलाकारांचा साई कला मंच निर्मित रंगी रंगला महाराष्ट्र हा कार्यक्रम होणार आहे. याच दिवशी इनर व्हील क्लब ऑफ कुडाळ आयोजित मोड आलेल्या कडधान्यांवर आधारित पाककला स्पर्धा होणार आहे. 31 डिसेंबर रोजी साई जळवी फिल्म प्रस्तूत अफलातून मनोरंजनाचा धुमधडाका कार्यक्रम होणार आहे. यामध्ये सुपरस्टार संतोष जुवेकर, तू आभाळ फेम पार्श्वगायक रविंद्र खोमने, महाराष्ट्र राज्य पुरस्कार प्राप्त सुप्रसिद्ध गायिका अमिता घुगरी, कोकणचा महागायक सागर कुडाळकर, सुप्रसिद्ध अभिनेत्री व नृत्यांगना नुपूर जोशी, निवेदक किरण खोत असणार आहेत. तिरूमला तिरूपती मल्टीस्टेट को ऑप सोसायटी पुरस्कृत रोटरी महोत्सव च्या प्रत्येक दिवशी भव्य लकी ड्राॅ सोडत विविध आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत. 31 डिसेंबर रोजी लकी ड्राॅ सोडतमधील महाभाग्यवान विजेत्यास आकर्षक सायकल भेट देण्यात येणार आहे 31 डिसेंबर रोजी इन्स्पायर सायकल पुरस्कृत दोन उपस्थित असलेल्या महाभाग्यवान विजेत्यांना हिरो कंपनीच्या सायकल देण्यात येणार आहेत. रोटरी महोत्सवात  31 डिसेंबर रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांदा येथील अलाईव्ह स्टॅच्यू ग्रुपचे कलाकारांचे खास आकर्षण असणार आहे. रोटरी महोत्सवात भव्य आटो एक्स्पो फोर व्हिलर व टू व्हिलर गाड्यांचे दालन सर्वांसाठी असणार आहे. यामध्ये महिंद्रा, ह्युंडाई, एमजी, सिट्राॅन, बीवायडी, फोक्सव्हॅगन, सुझुकी, राॅयल एनफील्ड, टाटा, टोयाटो अशा विविध नामांकित कंपन्यांचा समावेश असणार आहे. स्थानिक कलाकारांचे ग्रुपडान्स सादरीकरण रोटरी महोत्सवात केले जाणार आहे.

error: Content is protected !!