छत्रपतींच्या पुतळ्याप्रकरणी जयदीप आपटे ला वाचवण्यासाठी भाजप चे व राणे समर्थक वकील

माजी आमदार परशुराम उपरकर यांचा खळबळ जनक आरोप
हिंदूंचे नेते म्हणणारे गब्बर नितेश राणे या प्रकरणात गप्प का?
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्यानंतर सत्ताधारी पक्षांच्या ज्या भूमिका होत्या त्या संशयास्पद होत्या. काही पुढाऱ्यांनी तो पुतळा पाडला व दंगल घडवण्याचा काहीजण प्रयत्न करतात असं बोलून दाखवलं. तर काही ठिकाणी सत्ताधाऱ्यांनी वाऱ्यामुळे पुतळा पडला असं वक्तव्य केलं. माजी खासदारांनी वैभव नाईक यांनी तो पुतळा पडला असावाअशी शंका घेत असं वक्तव्य केलं. परंतु हा पुतळा चुकीमुळे पडला त्यामुळे पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल केला. पुतळा बनवणारा शिल्पकार जयदीप आपटे हा कुणातरी बीजेपीच्या माणसाकडे लपून बसला होता हे आता सिद्ध झालं आहे. कारण या प्रकरणात काल आलेले वकील हे भाजपाचे ठाण्यामध्ये गणेश सोहनी हे होते. तर दुसरे वकील हे राणे समर्थक राणेंचे कार्यकर्ते ऍड. राजेश परुळेकर हे सिंधुदुर्ग जिल्हा वकील सेलचे अध्यक्ष होते. आपटेला वाचवण्यासाठी भाजपा वकील देत आहे हे यातून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पुतळ्याचा विषय कुठेतरी दडपण्याचा प्रयत्न भाजपा करत असल्याचा आरोप माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केला. कणकवलीत संपर्क कार्यालयात पत्रकार परिषदेत उपरकर बोलत होते. वकिलांनी देखील पुतळा वाऱ्याने पडलं हेच तेच स्टेटमेंट केला आहे. मात्र तेथील स्थानिक म्हणतात की या वाऱ्याने आमचा एकही नारळ पडला नाही. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी देखील याबाबत भाष्य केला असून या पुतळ्याला स्टीलचा वापर करायला पाहिजे होतं असं देखील मत त्यांनी मांडला आहे. या प्रकरणात एकमेकांना वाचवण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळेच मागील झालेल्या मोर्चात राणे भडकले व राणीने जी वक्तव्य केली ती सर्वांसमोर आली आहेत. राज्यभरात सर्वत्र फिरत असणारे या मतदारसंघाचे आमदार नितेश राणे हे स्वतःला हिंदूंचे गब्बर समजतात. ते नितेश राणे हिंदूंचे आराध्य दैवत असणारे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्यावर या प्रकरणावर का बोलू शकले नाहीत. असा सवाल उपरकर यांनी केला. त्या आपटे सोबत आप्पासाहेब पटवर्धनांचा पुतळा बनवल्यानंतर आमदार राणेंचे काही फोटो व्हायरल झाले आहेत. त्यामुळेच जयदीप आपटे बद्दल आमदार नितेश राणे कुठेही बोलत नाहीत. त्यामुळेच ते जिल्ह्यातल्या प्रकरणावर लक्ष देत नाहीत. मात्र राज्यातल्या प्रकरणांवर बोलतात ही खरी या प्रकरणात शोकांकिता व यात खरी मेक आहे. असा टोला माजी आमदार उपरकर यांनी लगावला. ज्या जिल्ह्यात आपण राहतो त्या जिल्ह्यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर बोलायचं नाही मात्र राज्यभरातील विषयांवर बोलायचं या संपूर्ण प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जरी माफी मागितली तरी जिल्ह्यातील स्थानिक भाजपचे लोक मात्र माफी मागत नाहीत. देवेंद्र फडणवीस पालकमंत्री किंवा भाजपच्या कोणत्याही लोकप्रतिनिधीने व खासदार नारायण राणे यांनी देखील माफी मागितलेली नाही. याचाच अर्थ या सर्वामागे भारतीय जनता पक्ष आहे. असा आरोप माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केला.
दिगंबर वालावलकर /कणकवली