नाणोस मध्ये रंगला खेळ पैठणीचा !

महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

ज्येष्ठ महिला, उद्योजिका, विद्यार्थिनी यांचा सन्मान

निलेश जोशी । सिंधुदुर्ग : 8 मार्च हा जागतिक महिला दिवस ग्रामपंचायत नाणोस तसेच श्री देव वेतोबा ग्रामसंघ यांच्या संयुक्त विद्यमाने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. नाणोस गाव मर्यादित खेळ पैठणीचा तसेच विविध खेळ आणि मनोरंजन कार्यक्रम, जेष्ठ महिला, गावातील उद्योजिका, यशस्वी मुली यांचे सत्कार समारंभअशा विविधरंगी कार्यक्रमांनी हा सोहळा रंगतदार झाला. पंचक्रोशीतील महिला सरपंच आणि महिलांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम संपन्न झाला.


क्रांतीवीर सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार आणि द्विपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. यावेळी शाळेतील मुलांनी ईशस्तवन आणि ग्रामसंघाच्या महिलांनी स्वागतगीत सादर केले. या कार्यक्रमाला तिरोडा गावच्या सरपंच सौ प्रियांका सावंत, भोमवाडी सरपंच सौ विद्या वराडकर (वाडकर), धाकोरा सरपंच सौ स्नेहा मुळीक, चोडणकर बाई, नेवगी बाई, शेणई बाई आदी मान्यवर उपस्थित होते.


कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आणि प्रास्ताविक ग्रामपंचायत सदस्य सागर नाणोसकर यांनी केले अध्यक्षिय मनोगत नाणोस सरपंच सौ प्राजक्ता शेट्ये यांनी केले. ग्रामसेवक श्री करंगुटकर यांनी सुद्धा मनोगत व्यक्त केले. मान्यवरांचे स्वागत ग्रामपंचायत उपसरपंच सौ अमिता नाणोसकर, सौ संध्या नाणोसकर, श्रीपाद ठाकुर, विनायक शेट्ये, सौ रसिका जोशी, सौ सानिका शेट्ये यांनी केले. ग्रामपंचायत सरपंच , उपसरपंच, कर्मचारी यांचे स्वागत श्रीदेव वेतोबा ग्रामसंघ यांचे पदाधिकारी सौ‌ नयन कांबळी, सौ. रतिष्मा शेट्ये, सौ. सुप्रिया गोडकर यांनी केले.
नाणोस गाव खेळ पैठणीचा तसेच मनोरंजनाचे कार्यक्रम युसूफअलि आवटि यांनी आपल्या सुरेख कौशल्याने सादर करुन या पैठणीचा आणि संगित खुर्ची विजेता घोषित केला. तदनंतर मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना पैठणी देण्यात आली. तसेच सत्कार सोहळा संपन्न झाला.
संजय नाणोसकर, दादा पालयेकर, चंद्रकांत शेट्ये, अरुण नाणोसकर ,नाना कांबळी यांच्या सहकार्याने भोजनाची व्यवस्था करण्यात अली होती. कार्यक्रमाची छायाचित्र अशोक नाईक तर मंडप व्यवस्था चेतन भगत यांनी केली.खेळीमेळीच्या या सोहळ्यास करंगुटकर भाऊ, माजी सरपंच बाळकृष्ण जोशी, गुरव‌ गुरूजी, परब गुरुजी, मिलिंद नाणोसकर, शारदा जोशी, प्रदीप परब, रघुनाथ जोशी, दाजी तळकर, नाणोस युवा मित्र मंडळ, विविध मान्यवर, महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

निलेश जोशी, कोकण नाऊ, सिंधुदुर्ग.

error: Content is protected !!