बॅ. नाथ पै सेन्ट्रल स्कूलमध्ये एन.आय.ओ.एस. दिल्लीच्याअभ्यासकेंद्रास मान्यता

सिंधुदुर्गातील पहिले केंद्र

शिक्षण प्रवाहात नसलेल्याना प्रवाहात आणण्यासाठी उपयुक्त ठरणार

प्रतिनिधी । कुडाळ : भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या अधिपत्याखाली घालणारे देशातील एकमेव राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ शिक्षा संस्थान एन.आय.ओ.एस. (National Institute of Open Schooling) नवी दिल्ली या बोर्डाने कुडाळ येथील बॅ. नाथ पै सेंट्रल स्कूल या सीबीएसई अभ्यासक्रमाच्या शाळेस सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिल्या अभ्यासकेंद्राची मान्यता दिली असून सदरील अभ्यास केंद्र शैक्षणिक वर्ष एप्रिल २०२३ पासून सुरू होत आहे.
एन. आय.ओ.एस.चे हे सिंधुदुर्गातील पहिले मान्यता प्राप्त अभ्यासकेंद्र असून या केंद्रात दहावी बारावी व तसेच शिक्षण प्रवाहात नसलेल्या कोणत्याही व्यक्तीला मुख्य शिक्षणप्रवाहात आणण्यासाठी, साक्षरता वाढवण्याच्या हेतूने समाजातील सर्व घटकांना शिक्षण देण्यासाठी एनआयओएस प्रामुख्याने काम करत आहे.
या मंडळाच्या परीक्षा वर्षातून दोन वेळा म्हणजेच एप्रिल मे आणि ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये एन.आय.ओ.एस. ने निश्चित केलेल्या तारखेनुसार घेतल्या जातात तथापि ज्या विद्यार्थ्यांनी विषयनिहाय शिक्षणासाठी एन.आय.ओ.एस. मध्ये प्रवेश घेतलेला आहे त्यांच्या मागणी प्रमाणे परीक्षा घेण्याची सुविधा या मंडळामार्फत दिली जाते. हे या मंडळाचे खास वैशिष्ट्य आहे.
काही कारणामुळे मुख्य शिक्षण प्रवाहातून दुरावलेल्या किंवा मुख्य प्रवाहातून लांब गेलेल्या विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा आणि लवकरात लवकर या शैक्षणिक वर्षासाठी आपला प्रवेश निश्चित करावा असे आवाहन बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर आणि बॅ. नाथ पै सेन्ट्रल स्कूलच्या प्राचार्या सौ. शुभांगी मारुती लोकरे यांनी केले आहे.
सदर अभ्यासकेंद्राच्या मान्यतेसाठी खाजदार विनायक राऊत यांनी विशेष प्रयत्न केले.अधिक माहितीसाठी कुडाळ एमआयडीसी येथील बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेच्या बॅ. नाथ पै सेंट्रल स्कूल येथे या संपर्क क्रः ७५८८९६६६७७ संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रतिनिधी, कोकण नाऊ, कुडाळ.

error: Content is protected !!