कणकवली परबवाडी मधील महिलांनी विविध उपक्रम राबवत केला महिला दिन साजरा

नगरपंचायत गटनेते संजय कामतेकर यांच्या माध्यमातून सातत्याने राबविले जातात उपक्रम
कणकवली शहरातील परबवाडी मध्ये महिलांमधील कलागुणांना वाव देणाऱ्या विविध स्पर्धा व फनी गेम्स घेत यांद्वारे महिला दिन साजरा करण्यात आला. गेली पाच वर्ष सातत्याने या भागाचे नगरसेवक नगरपंचायतचे गटनेते संजय कामतेकर यांच्या माध्यमातून हा उपक्रम राबवला जातो. यावर्षी देखील या भागातील महिलांचे अनेक कार्यक्रम घेण्यात आले. त्यावेळी
सायली परब,स्मिता परब,प्रिया मेणसे,रूपा परब,स्मिता परब,विदया परब,तृप्ती परब,वंदना कामतेकर,सुचित्रा परब,सीमा परब,प्राची परब,सीमा मगम,दीपाली परब,शमिका परब,भाग्यश्री परब,अस्मिता परब,वनिता परब,अर्चना सरंगले,शीतल सरंगले.उषा परब,रिया चव्हाण,आराधना सरंगले,सुजाता आणि महिला उपस्थित होत्या. या उपक्रमाबद्दल या महिलांनी समाधान व्यक्त केले.
दिगंबर वालावलकर /कणकवली