जिल्हाधिकाऱ्यांची कुडाळ तहसीलला भेट ; निवडणूक कामाचा घेतला आढावा

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक साठी मतदान येत्या 7 फेब्रुवारीला होणार आहे. आणि मतमोजणी 9 फेब्रुवारी रोजी होणार आहे. त्या अनुषंगाने प्रशासनाची तयारी जोरात सुरू आहे. कुडाळ तहसील कार्यालय येथे सुद्धा ही तयारी या तयारीने जोर पकडला आहे. आज कुडाळ तहसील कार्यालयामध्ये मतदान यंत्र मतदानासाठी तयार करणे आणि सीलबंद करणे ही कामे करण्यात आली. जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आज कुडाळ तहसील कार्यालयाला भेट देऊन पाहणी केली.
आज कुडाळ तहसिल कार्यालय येथे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक 2026 च्या अनुषंगाने मतदान यंत्र मतदानासाठी तयार करणे आणि सीलबंद करणे अर्थात EVM Commissioning कामकाजादरम्यान जिल्हाधिकारी श्रीम. तृप्ती धोडमिसे, अप्पर जिल्हाधिकारी श्रीम. शुभांगी साठे, उपजिल्हाधिकारी श्रीम. प्रतिभा वराळे यांनीभेट देऊन निवडणूक कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी प्रांताधिकारी ऐश्वर्या काळूशे, तहसीलदार सचिन पाटील आणि इतर अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते।

error: Content is protected !!