अमली पदार्थ, अवैध दारू विरोधात युवासेना आक्रमक

सुशांत नाईक यांच्या नेतृत्वाखाली देवगडात मोर्चा

पोलीस निरीक्षक व एक्साईज चे दुय्यम निरीक्षक यांना ठणकावले

उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक त्यांच्या नेतृत्वाखाली अवैद्य दारू धंद्याची विक्री आणि अमली पदार्थ याच्या विरोधात देवगड एक्साईज ऑफिसवर जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे, युवा जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, आपचे जिल्हाध्यक्ष विवेक ताम्हणकर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गटाचे वरिष्ठ नेते नंदकुमार घाटे , उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे महिला तालुकाध्यक्ष हर्षा ठाकूर, सायली घाडी, काँग्रेसचे तालुकाप्रमुख कुलकर्णी, प्रसाद करंदीकर, उबाठा शिवसेना तालुका अध्यक्ष मिलिंद साटम, नगरसेवक बुवा तारी, तेजस मामघाडी, युवासेना तालुकाध्यक्ष गणेश गावकर, युवासेना तालुकाध्यक्ष फरीद काझी, दिनेश नारकर, सागर गुरुले, तेजस राणे, गुरुनाथ पेडणेकर, धीरज मेस्त्री, निनाद देशपांडे, संदिप डोळकर, सुनील तेली, सुनील जाधव, दिपक कदम, दिपक तोरस्कर, मंगेश फाटक, मनोज भावे, संतोष दळवी आणि असंख्य महाविकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
जन आक्रोश मोर्चा कॉलेज नाका येथून सुरवात झाली मांजरेकर नाका येथून पंचायत समिती मार्गे बाजारपेठ करून देवगड एक्साईज ऑफिसवर वर नेण्यात आला त्यानंतर तेथे
त्यानंतर तेथे घोषणा देण्यात आल्या या सरकारच करायचं काय खाली डोकं वर पाय…. अमली पदार्थ बंद झालेच पाहिजेत… अवैद्य दारूबंदी झालीच पाहिजे… महाविकास आघाडीचा विजय असो…. जागे व्हा जागे व्हा पोलीस प्रशासन जागे व्हा… शिवसेना जिंदाबाद…. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो.. अशा नाना प्रकारच्या घोषणा देऊन परिसर दुमदुमला.
जना आक्रोश मोर्चातील नेतृत्व करणारे सुशांत नाही आणि महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी एक्साईज ऑफिस मधील दुय्यम निरीक्षक संतोष घावरे आणि देवगड
पोलीस निरीक्षक मनोज सोनवलकर यांना बाहेर बोलवून निवेदन देऊन लवकरात लवकर आमली पदार्थ आणि अवैद्य तारू धंदे देवगड तालुक्यातून बंद झालेच पाहिजे असे ठणकावून सांगितले.

देवगड/ प्रतिनिधी

error: Content is protected !!