कणकवली शहर विकास आराखड्यावर सूचना, हरकती मांडण्याकरिता अजून एक महिन्याची मुदतवाढ द्या!

माजी आमदार परशुराम उपरकर यांची नगरविकास विभागाच्या उपसंचालकांकडे मागणी
कणकवली नगरपंचायत चा प्रारुप आराखडा प्रसिद्ध करून कार्यालयात व नगरपंचायत कार्यालयात प्रारूप आराखडा सूचना व हरकती मांडण्याकरिता तसेच नागरिकांना पहाण्यासाठी उपलब्ध करून दिला आहे. सदर आराखडयात रस्त्यांबरोबर विविध आरक्षणे टाकलेली असून काही जमीन मालकांना सीटी सर्व्हे नंबर कळत नसल्याने जमीन मालकांकडे ७/१२ असलेल्या जमीन मालकांचा गोंधळ उडाला आहे. प्रारूप आराखडयामध्ये सिटी सर्व्हे नंबरमध्ये काही सिटी सर्व्हे काही ठिकाणी आराखडयामध्ये प्रसिद्ध केलेले आहे. त्यावरती हरकतीना ३० दिवसांची मुदत देऊन दिनांक ३१/०३/२०२६ रोजी पर्यंत हरकती मागविण्यात आलेल्या आहेत. हरकती घेण्याकरीता बहुतांशी जमिनधारकांना सिटी सर्वे नंबर काय आहे, हे माहीत नाही व सध्या भूमी अभिलेख कार्यालयाचा संप असल्याने भूमी अभिलेख कार्यालयाकडून सिटीसर्वे नंबरचे रेकॉर्ड देणे बंद असल्याने सीटीसर्व्हे नंबर व प्रॉपर्टी कार्ड चा नकाशा उपलब्ध होत नसल्याने जनता व जमिन मालक यांची अडचण निर्माण झालेली आहे. हरकती घेण्याकरीता सीटी सर्व्हे नंबरची प्रॉपर्टी नकाशा व अन्य काही पुरावे मिळण्याकरीता भूमी अभिलेख कार्यालयाचा संप असल्याने ती संप मिटल्यानंतर पुढील महिन्याचा अवधी देऊन हरकती सूचना घेण्याकरीता मुदत वाढ देण्यात यावी अशी मागणी माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केली आहे.





