बिजलीनगर येथे स्वच्छता मोहिम उपक्रम

उपनगराध्यक्ष सुशांत नाईक व नगरसेवक जयेश धुमाळे स्वछता मोहिमेत सहभागी
बिजलीनगर वासियांचा स्वछता मोहिमेला उस्फुर्त प्रतिसाद
नगरपंचायत प्रशासनाच्या सहकार्याने व नगरसेवक जयेश थुमाळे यांच्या संकल्पनेतून दिनांक २८ फेब्रुवारी २०२६ रोजी वॉर्ड क्रमांक १३, बिजलीनगर येथे स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले. परिसर स्वच्छ, सुंदर व निरोगी ठेवण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या मोहिमेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या स्वच्छता मोहिमेत उपनगराध्यक्ष सुशांत नाईक, नगरसेवक जयेश थुमाळे, प्रसाद अंधारी, नगरपंचायतीचे अधिकारी अमोल आगम, श्रीमती सोनाली खैरे मॅडम, जयंती ठाकरे मॅडम, ध्वजा उचले मॅडम तसेच कणकवली नगरपंचायतीचे सफाई कर्मचारी उपस्थित होते. तसेच कणकवली शहरातील सामाजिक कार्यकर्ते मधुसुदन परब, किशोर सोगम, गौरेश डिचोलकर, अक्षय परब, विरेंद्र विचारे, राज विचारे, प्रदीप तळगावकर, रवी भंडारे, यांच्यासह अनेक नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवला. तसेच विद्यामंदिर हायस्कूलचे श्री. शेलके सर, श्रीमती अंधारी मॅडम तसेच स्काऊट-गाईड व एनसीसीचे विद्यार्थी मोठ्या संख्येने या मोहिमेत सहभागी झाले होते. सर्वांनी एकत्र येऊन वॉर्ड क्रमांक १३ परिसराची साफसफाई करत स्वच्छतेचा प्रभावी संदेश दिला. ही स्वच्छता मोहीम यशस्वी व्हावी यासाठी श्री उबाळे मेडिकलचे मालक नंदकुमार उबाळे यांनी मास्क व हँडग्लोज यांचा पुरवठा केला. त्याबद्दल त्यांचे विशेष आभार मानण्यात आले.
यावेळी नगरसेवक जयेश थुमाळे यांच्या संकल्पनेतून उपस्थित सर्वांनी परिसर स्वच्छ ठेवण्याची स्वच्छता शपथ घेतली. कार्यक्रमाच्या शेवटी अमोल भोगले यांनी उपस्थित सर्वांचे आभार व्यक्त केले.





