कणकवली नगरपंचायत कडून सखोल स्वच्छता अभियान

स्वच्छता मोहिमेत सहभागी व्हा

कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर मुख्याधिकारी गौरी पाटील यांचे आवाहन

सार्वजनिक स्‍वच्‍छता ही कणकवली नगरपंचायत चे प्राथमिक कर्तव्‍य असून ती निरंतर चालणारी प्रक्रिया आहे.कणकवली शहर स्वच्छ व सुंदर राखण्यासाठी सुरु असलेले सखोल स्वच्छता (Deep Cleaning) अभियान हे फक्त नावलौकिकासाठी नव्‍हे तर त्याहून जास्त सार्वजनिक आरोग्य व स्वच्छतेसाठी महत्‍त्‍वाचे आहे.  
    सखोल स्‍वच्‍छ मोहिमेला लोक चळवळीमध्ये रुपांतरित करण्यासाठी कणकवली नगरपंचायतने सातत्यपूर्ण प्रयत्न केले आहेत व भविष्यातही करत राहील. ही मोहीम अशीच यापुढे देखील सातत्याने व जोमाने सुरू राहील, अशी ग्‍वाही मुख्याधिकारी श्रीमती.गौरी पाटील व नगराध्यक्ष श्री.संदेश पारकर  यांनी दिली. कणकवली ढालकाठी ते प्रांत कार्यालय,उड्डाणपूला खाली,मराठा मंडळ परिसर व इतर  प्रमुख ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली आहे.सदर स्वच्छता मोहीम मध्ये कणकवली नगरपंचायतचे नगरसेवक, परिसरातील नागरिक, नगरपंचायत अधिकारी कर्मचारी, विद्यार्थी यांनी उत्स्पूर्तपणे सहभाग नोंदविला.ह्या पुढे देखील अश्या स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार असून यामध्ये सर्वानी सहभाग नोंदवावा व आपली कणकवली स्वच्छ व सुंदर बनविण्यात सहकार्य करावे असे आवाहन मुख्यधिकारी व नगराध्यक्ष यांनी केले आहे.
 स्‍वच्‍छता मोहीम राबविल्‍यानंतर तो परिसर कायम स्‍वच्‍छ व सुंदर ठेवण्‍याची जबाबदारी ही शहरात येणाऱ्या व शहरात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकांची देखील आहे. यासाठी कणकवलीतील नागरिकांनी, सामाजिक संस्थानी स्‍वच्‍छता मोहिमेत सहभागी व्‍हावे, असे आवाहन देखील मा.मुख्याधिकारी व मा.नगराध्यक्ष यांनी केले.
error: Content is protected !!