हळवल मध्ये 6 मार्च रोजी शिवजन्मोत्सव सोहळा

दशावतारी नाटकाचे आयोजन
शिवजयंती उत्सव २०२६ वर्ष ३८ वे
शिवजयंती उत्सव मंडळ च्या वतीने (तिथीनुसार) शिवजयंती उत्सव २०२६ चे आयोजन करण्यात आले आहे.
शुक्रवार ६ मार्च २०२६ रोजी हा शिवजन्मोत्सव सोहळा साजरा होत असून त्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ९ वा. शिवछत्रपती चे महापूजन,
१० वा. सत्यनारायणाची महापूजा
दुपारी १२ नंतर आरती व तिर्थप्रसाद
सायं. ७ वा. सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदाय, सिंधुदुर्ग यांचा हरिपाठ
रात्री ८ वा. आदर्श व्यक्तीमत्व पुरस्कार प्रदान कार्यक्रम, ८.३० वा. वालावलकर दशावतार नाट्य मंडळ यांचे दशावतारी नाटक सुरत चंद्रिका होणार आहे. तरी सर्व कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन राजू राणे शिवजयंती उत्सव मंडळ,हळवल यांनी केले आहे.





