वाडातर पुलावरून खाडीत ढकलून महिलेला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आरोपीची निर्दोष मुक्तता

आरोपीच्या वतीने ॲड. अक्षय चिंदरकर यांचा युक्तिवाद

एकतर्फी प्रेमसंबंधातून कणकवली येथे राहणाऱ्या उत्तर प्रदेशातील महिलेला देवगड तालुक्यातील वाडातर पुलावरून ढकलून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आरोपी राजू उर्फ तूकाराम दत्‍ताराम पांगम (वय ३4 वर्षे, रा. बांधकरवाडी, कणकवली) याची सिंधुदुर्ग ओरोस येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एम. देशपांडे यांनी निर्दोष मुक्तता केली. आरोपीच्यावतीने ऍड. अक्षय चिंदरकर यांनी काम पाहिले.

दाखल फिर्यादीनुसार, वाडा येथील देवगड ते पडेल जाणाऱ्या रस्त्यावरील वाडातर पुलावर 10 डिसेंबर २०२० रोजी ही घटना घडली होती. यातील पिडीत फिर्यादी कमलेश चुनू कश्यप ही मुळची उत्तरप्रदेश येथील राहणारी असून, ती कामानिमीत्त आपल्या दोन मुलांसह कणकवली येथे राहते. तीच्या शेजारी आरोपी राजु ऊर्फ तुकाराम दत्ताराम पांगम हा आपले आई वडीलांसोबत राहत होता. दोन वर्षापासून पिडीत फिर्यादी व आरोपी यांचे प्रेमसंबंध होते. पिडीत फिर्यादी हीला आरोपी सोबत प्रेमसंबंध ठेवायचे नव्हते. या रागाने आरोपी याने १० डिसेंबर २०२० रोजी सकाळी पिडीत फिर्यादी ही तीच्या खोलीवर असताना आरोपीने तीच्या मोबाईलवर कॉल केला व “माझ्या आईची तब्येत बरी नाही, तु घरी ये, तुला मी रस्त्यावर भेटतो” असे सांगितले. त्याप्रमाणे फिर्यादी ही घरातून रस्त्यावर जावून उभी राहीली असता आरोपीने आपल्या मोटार सायकल वर पिडीत फिर्यादीला बसवून घेऊन निघाला. काही वेळानंतर फिर्यादी हीने आरोपीला विचारले की, “कोठे चालला आहेस” त्यावेळी आरोपी हा मोटार सायकल वेगात घेवून जात होता. फिर्यादी ही बराच वेळ झाल्याने ती गाडीवरुन उतरण्याचा प्रयत्न करीत होती. परंतू आरोपीने मोटारसायकल वेगात चालवून पहाटे ०६.०० वाजताचे सुमारास वाडा येथील पुलावर मोटार सायकल थांबवली व फिर्यादीस गप्प बसण्यास सांगून तीला पकडले व तीचे ओढणीला धरुन पुलाच्या कठड्यावरुन पाठीमागून जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने पुलावरुन खाली पाण्यात ढकलून दिले. त्यामूळे तीचे डोळ्याच्या खाली व कपाळावर मुका मार लागला होता. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीच्या विरोधात भा. द. वि. कलम ३०७, ३२३ प्रमाणे गुन्हा दाखल करून त्याला अटक केली होती. सुनावणी दरम्याने सरकारी पक्षाकडून तपासण्यात आलेल्या साक्षीदारांच्या साक्षीतील तफावती तसेच कोणताही विश्वासार्ह्य पुरावा पुढे न आल्याने न्यायालयाने आरोपीची निर्दोष मुक्तता केली.

error: Content is protected !!