कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खारेपाटण येथे मराठी विभाग आयोजित मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा

कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय खारेपाटण येते मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला. मराठी भाषा ही महाराष्ट्राची ओळख, संस्कृती आणि अस्मिता जपणारी समृद्ध भाषा आहे. मराठी भाषेचे जतन व संवर्धन करण्याच्या उद्देशाने दिनांक २७ फेब्रुवारी रोजी मराठी भाषा गौरव दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी मराठी या गीताने झाली.तसेच मराठी भाषेचे जनक कवी कुसुमाग्रज यांचे स्मरण करून करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुण्यांनी आणि अध्यक्ष प्राचार्य डॉ. ए. डी. कांबळे यांनी मराठी भाषेचे महत्त्व, तिचा इतिहास तसेच आधुनिक काळातील मराठी भाषेचे स्थान याविषयी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी मराठी कविता वाचन, भाषण स्पर्धा, निबंध लेखन आणि घोषवाक्य सादरीकरणाद्वारे कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

मराठी भाषा ही केवळ संवादाचे माध्यम नसून संस्कार, विचार आणि परंपरेची वाहक असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले. डिजिटल युगातही मराठी भाषेचा वापर वाढविण्याची गरज अधोरेखित करण्यात आली.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजन करण्यासाठी , प्राचार्य डॉ ए. डी. कांबळे ,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांमध्ये मराठी भाषेबद्दल अभिमान आणि जाणीव निर्माण करणारा हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मराठी वाड्मय मंडळ प्रतिनिधी कुमारी अमिषा अनंत पवार हिने केले तर प्रास्ताविक मराठी विभाग प्रमुख प्रा. सौ. रश्मी देसाई यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रतीक जाधव याने मानले. अश्या प्रकारे हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.

error: Content is protected !!