चर्मकार उन्नती मंडळाची वाटचाल प्रेरणादायी-प्राजक्ता बांदेकर/शिरवलकर मंडळाचा ४२ वा वर्धापन दिन व सन्मान सोहळा संपन्न

सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळ समाजासाठी राबवीत असलेले उपक्रम,त्यांचे समाजकार्य पाहता या मंडळाची वाटचाल सर्वांनाच प्रेरणादायी आहे असे गौरवोद्गार कुडाळ नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर/शिरवलकर यांनी काढले.तसेच मंडळामार्फत चालू असलेल्या संत रविदास भवनास सहकार्य करू असे आश्वासित केले.
सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळाच्या वतीने संघटनेचा ४२ वा वर्धापन दिन व विशेष सन्मान सोहळा मराठा समाज सभागृह कुडाळ येथे पार पडला.
यावेळी या कार्यक्रमाचे उद्घाटन कुडाळ नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर/शिरवलकर यांचे हस्ते दीप प्रज्वलित करून करण्यात आले. संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुजित जाधव हे कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी होते. कार्यक्रमात कणकवली पंचायत समिती सदस्य म्हणून निवडून आलेल्या समाज भगिनी महेश्वरी चव्हाण,कणकवली नगरपंचायत मध्ये नगरसेविका म्हणून निवडून आलेल्या समाज भगिनी दिपिका जाधव/सरमळकर तसेच प्राजक्ता बांदेकर यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.यावेळी “मागोवा संघटनेचा “ या विषयावर वक्ते प्रा.नितीन बांबर्रडेकर यांनी विषय विवेचन करत संघटनेच्या ४२ वर्षांचा इतिहास मांडला.यावेळी संघटनेचे जिल्हा सरचिटणीस चंद्रसेन पाताडे,जिल्हा कोषाध्यक्ष नामदेव जाधव,जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र चव्हाण,उत्तम चव्हाण,माजी जिल्हाध्यक्ष नंदन वेंगुर्लेकर,सहसचिव बाबुराव चव्हाण,सुभाष बांबुळकर,महिला सदस्या प्रिया आजगांवकर,मयुरी चव्हाण,माजी जिल्हा सरचिटणीस श्रीराम चव्हाण,उदय शिरोडकर,जिल्हा सदस्य नरसू रेडकर,आनंद जाधव,प्रसाद पाताडे,प्रवक्ता सुनील जाधव,सल्लागार प्रदीप पवार,पी.बी.चव्हाण,कुडाळ तालुकाध्यक्ष संतोष चव्हाण,कणकवली तालुकाध्यक्ष महेंद्र चव्हाण,मालवण तालुकाध्यक्ष हरेश चव्हाण,सावंतवाडी तालुकाध्यक्ष विनायक चव्हाण,माजी अध्यक्ष गणेश म्हापणकर,कणकवली सचिव मंगेश आरेकर,मालवण सचिव संभाजी कोरे ,वेंगुर्ला सचिव महेश चव्हाण,संघटक गुरुप्रसाद चव्हाण,युवा प्रमुख प्रकाश वाघेरकर,शिक्षण प्रमुख प्रशांत चव्हाण ,साहित्य प्रमुख सुरेश पवार,योजना प्रमुख लवेंद्र किंजवडेकर,व्यवसाय प्रशिक्षण प्रमुख अनिल चव्हाण,भवन सहप्रमुख राजन वालावलकर,युवा मालवण अध्यक्ष मनोहर पाताडे,युवा कणकवली अध्यक्ष महेंद्र देवरुखकर,युवा वेंगुर्ला अध्यक्ष रोहित वेंगुर्लेकर,वधुवर समिती सहप्रमुख सुनील पाताडे,युवा सहप्रमुख हेमंत फोंडेकर,व्यवसाय प्रशिक्षण सहप्रमुख रामदास चव्हाण,तालुका पदाधिकारी संतोष जाधव ,विजय पाताडे,नितीन पाताडे,दीपक पाताडे,संदेश मोचेमाडकर,सुहास मोचेमाडकर,गणपत चव्हाण,श्री.सरमळकर आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रम प्रसंगी माजी जिल्हा सरचिटणीस श्रीराम चव्हाण यांनी संघटनेच्या मागील ठळक आठवणीना उजाळा दिला. जिल्हाध्यक्ष यांनी संघटनेला सर्वांनी सहकार्याचा हात द्यावा,आपली स्वप्ने पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाईल असे सांगितले .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा सरचिटणीस चंद्रसेन पाताडे यांनी केले तर आभार रामदास चव्हाण यांनी मानले.





