पदर प्रतिष्ठान मार्फत महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

7 मार्च रोजी पाककला स्पर्धा

विविध स्पर्धां मध्ये सहभागी होण्याचे अध्यक्ष मेघा गांगण यांचे आवाहन

8 मार्च रोजी जागतिक महिला दिन यानिमित्ताने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी कणकवली मधील पदर महिला प्रतिष्ठान मार्फत महिलांसाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
दिनांक शनिवार 7 मार्च रोजी पाककला स्पर्धा होणार आहे. यामध्ये महिलांनी पालक आणि कोथिंबीर यापासून पदार्थ घरी बनवून 4.00 वाजता लक्ष्मी विष्णू हाॅलमध्ये घेऊन यायचे आहेत. तसेच फनी गेम्स घेण्यात येणार आहेत. तसेच मुली आणि स्त्रिया यांच्या सुरक्षिततेची माहिती देण्यासाठी मानसशास्त्रीय समुपदेशक कावेरी कासरलकर या येणार आहेत.
रविवार दिनांक 8 मार्च रोजी सायंकाळी 4.00 वाजता महिलांचे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
यामध्ये अश्विनी फॅशन डिझायनिंग यांचा फॅशन शो, फॅन्सी ड्रेस स्पर्धा, रेकॉर्ड डान्स, एकपात्री अभिनय, ग्रुप डान्स घेण्यात येणार आहेत. तसेच कणकवली शहरात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या स्त्रियांचा गौरव करण्यात येणार आहे.
पाककले साठी आपण दिशा अंधारी 9422997667
आणि
सांस्कृतिक कार्यक्रम साठी प्रियाली कोदे 9420524203
यांच्याशी संपर्क साधावा.
भरघोस बक्षिसांसह 10 लकी ड्रॉ काढण्यात येणार आहे. दैनंदिन धावपळ आणि धकाधकीच्या जीवनातून आनंद घेण्यासाठी आणि महिला दिन उत्साहाने साजरा करण्यासाठी सर्व महिला वर्गाने लक्ष्मी विष्णू हाॅलमध्ये नक्की या असे आवाहन पदर महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा मेघा गांगण यांनी केले आहे.

error: Content is protected !!