कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या माध्यमातून स्मशानभूमी नूतनीकरण काम मंजूर

या भागातील नागरिकांकडून समाधान व्यक्त

कणकवली : नगरसेविका कविता राणे व माजी उपनगराध्यक्ष किशोर राणे यांच्या मागणीनुसार कणकवली- निम्मेवाडी येथे स्मशानभूमीचे काम नगराध्यक्ष समीर नलावडे व उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांच्या माध्यमातून काम मंजूर झाले व या कामास सुरुवात झाली.
तसेच तेथील स्थानिक नागरिकांनी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष व नगरसेवक यांचे सर्वांनी आभार मानले. कणकवली शहर विकासासाठी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षांकडून विविध उपक्रम राबवले जात असताना जनहीताची कामे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष यांनी केल्या बद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

दिगंबर वालावलकर / कणकवली

error: Content is protected !!