आचरा परीसरात पावसाचा जोर कायम

काझीवाडी येथे घरावर झाड पडून नुकसान

आचरा परीसरात पावसाचा जोर कायम असून सोसाट्याच्या सुटणारया वारयामुळे झाडे उन्मळून घरांचे,विद्यूत मंडळाचे अतोनात नुकसान होत आहे. गुरुवारी सकाळी आचरा काझीवाडी येथील इम्तियाज मुनिरुद्धीन अहमद काझी यांच्या घरावर कलम उन्मळून पडल्याने घराचे सुमारे 65हजाराचे नुकसान झाले.याबाबत आचरा तलाठी संतोष जाधव यांनी घटनास्थळी भेट देवून नुकसानीचा पंचनामा केला. यावेळी पोलीस पाटील जगन्नाथ जोशी ,नजमुल्ला काझी आदी उपस्थित होते.
तर आचरा देवूळवाडी मेस्त्री वाडी येथील मंगेश परशुराम मेस्त्री यांच्या परसातील चिंचेचे झाड उन्मळून पडल्याने मेस्त्री यांच्या गोबर गॅस सह विहिर ,माड झाडांचे मोठे नुकसान झाले. विद्यूत मंडळालाही फटका मुसळधार पावसासोबत जोरदार येणारया वादळी वाऱ्याचा फटका विद्यूत मंडळालाही बसला असून आचरा वरचीवाडी बापर्डेकर पोल्ट्री फॉर्म लगत,काझीवाडा,हिर्लेवाडी आदी भागात विद्यूत तारा तुटून मोठे नुकसान झाले.

आचरा, अर्जुन बापर्डेकर

error: Content is protected !!