जागृत गृप त्रिंबक कडून गावडे कुटूंबाला आर्थिक मदत

सोमवारी सायंकाळी अकस्मात आलेल्या वादळी वाऱ्यामुळे त्रिंबक गावातील साटम वाडी येथे राहणाऱ्या तारामती हरिश्चंद्र गावडे यांच्या राहत्या घराचे अतोनात नुकसान झाले होते. त्याचा संसार पावसापाण्यात उघड्यावर पडला आहे या बाबत जागृत त्रिंबक ग्रुप तर्फे गावडे कुटुंबीयाकरिता रू.11000/- ची मदत त्यांच्या घरी जाऊन त्यांचे पुतणे धोंडी लाडोबा गावडे यांचे कडे सुपूर्त केली..या वेळी सरपंच किशोर त्रिंबककर,उप सरपंच आशिष बागवे,ग्रुप सदस्य संतोष घाडीगावकर,अमेय लेले,शेखर सुतार,अजय पवार, बाळा साटम इ.तसेच तलाठी सेजल आदी उपस्थित होते. जागृत गृप त्रिंबक कडून गावडे कुटूंबाला आर्थिक मदत
आचरा, अर्जुन बापर्डेकर





