भाजपाच्या प्रवक्त्यांच्या यादीमध्ये आमदार नितेश राणे यांना स्थान

सकाळ दुपार व विभागीय अशा तीन सत्रा मधील प्रवक्त्यांची यादी जाहीर
प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून करण्यात आली यादी जाहीर
भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून महाराष्ट्र भाजपा च्या भूमिका मांडण्याकरिता व प्रसारमाध्यमांकडे प्रतिक्रिया देण्याकरता पत्रकार परिषद घेणे व मीडिया बाइट देण्याकरता अधिकृत प्रवक्त्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये विभागणी करण्यात आली असून सकाळी 9 वाजता पक्षाची भूमिका मांडण्याकरता जाहीर करण्यात आलेल्या यादीमध्ये कणकवली मतदारसंघाचे आमदार नितेश राणे यांचा समावेश करण्यात आला आहे. सिंधुदुर्गाचे सुपुत्र मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांच्यासह अन्य भाजप नेत्यांचा देखील या यादीमध्ये समावेश आहे. तर दुपारी 4 वाजता घेण्यात येणाऱ्या पत्रकार परिषद व बाईट करता सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र प्रदेश उपाध्यक्ष माधव भंडारी यांच्यासह भाजपाच्या अन्य नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे. तर विभागीय बाईट व पत्रकार परिषदे करता राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासह भाजपाच्या अन्य नेत्यांचा समावेश या प्रवक्त्यांच्या यादीमध्ये करण्यात आला आहे. आमदार नितेश राणे यांनी यापूर्वी अनेकदा पक्षाची भूमिका ठोस व यशस्वीपणे मांडल्याने त्यांचा पुन्हा या भाजपाच्या यादीमध्ये समावेश करण्यात आला आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही यादी जाहीर केली आहे.
दिगंबर वालावलकर /कणकवली





