मुसळधारे ‘ मुळे तिलारीचे पाणी पात्राबाहेर

पूरसदृश परिस्थिती ; कमी उंचीचे पूल पाण्याखाली

दोडामार्ग

तालुक्यात सतत मुसळधार पाऊस पडत असल्याने तिलारी नदीची पाणी पातळी वाढली आहे. पाणी पात्राबाहेर पडून पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.अनेक कमी उंचीचे पूल पाण्याखाली गेले आहेत.
साटेली भेडशी गावाला जोडणारा घोटगे परमे पूल पाण्याखाली गेला आहे.यामुळे घोटगे परमे गावाचा संपर्क तुटला आहे.पुलावर पाणी आल्याने काही ग्रामस्थ व शाळकरी विद्यार्थी अडकून पडले तर काही जणांनी तिलारी कालव्याच्या रस्ता आधार घेत चार ते पाच किलोमीटर फेरा मारून घर गाठले. दुपारी तीनच्या सुमारास पुलावरून पाणी वाहण्यास सुरुवात झाली होती.

झाडे पडली, वीज प्रवाहही खंडित

तालुक्यात पडणारा मुसळधार पाऊस आणि वादळी वारे यामुळे
तालुक्यातील अनेक गावात झाडे व फाद्या पडून दोडामार्ग व साटेली भेडशी परिसरातील अनेक गावातील वीज पुरवठा खंडित झाला होता .तसेच आंबेली कोनाळकरवाडी येथे दोडामार्ग – वीजघर रस्त्यावर बाजूचे आंब्याचे झाड पडल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती

error: Content is protected !!