वाघेरी चे सुपुत्र संतोष राणे यांचीमहाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज अग्रिकल्चर च्या कोकण विभागातून गव्हर्निंग कौन्सिल चे सदस्य म्हणून नियुक्ती

माजी सरपंच संतोष राणे यांनी केले अभिनंदन

कणकवली तालुक्यातील वाघेरी गावचे सुपुत्र एक आदर्श व्यक्तिमत्व, युनियन बँक ऑफ इंडिया चे माजी शाखा व्यवस्थापक, कुडाळ एमआयडीसी इंडस्ट्रीज असोसिएशनचे कायम नियंत्रित कार्यकारणी सदस्य व नव उद्योजक संतोष शिवाजी राणे यांची महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज अग्रिकल्चर च्या कोकण विभागातून गव्हर्निंग कौन्सिल चे सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडी बद्दल माजी सरपंच वाघेरी, चेअरमन पावणादेवी दुग्ध विकास संस्था वाघेरी चे संतोष बाजीराव राणे यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

कणकवली प्रतिनिधी

error: Content is protected !!