शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आंग्रे यांना अवैध मायनींग प्रकरणी 30 कोटी दंड

कणकवली तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांचे आदेश

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मायनींग लॉबी मध्ये खळबळ

आमदार नितेश राणेंनी केली होती तक्रार

सिध्दिविनायक मायनिंग करिता भागीदार श्री. संजय वसंत आग्रे व सी. संजना संजय आग्रे यांनी मौजे वाघेरी, ता. कणकवली, जि. सिंधुदुर्ग येथील गट नं ११४४/१/१ व ११४४/१/२ क्षेत्र हे. आर या मिळकतील खाणपट्टयामधून आतापर्यंत विक्री केलेले तसेच सदयस्थितीमध्ये खाणपट्टानध्ये साठा स्वरुपात असलेले असे एकूण १,२१,९८१ मे टन एवढ्या परिमाणाचे सिलिका सँड आणि क्वार्टझाईट हे गौणखनिज अवैध असल्याने चालू बाजारभावप्रमाणे महाराष्ट्र जमिन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ४८ (७) नुसार कारवाई करणेबाबत कळविण्यात आलेले होते. आमदार नितेश राणे यांनी या बाबत तक्रार केली होती. दिनांक ०३/०८/२०२२ अन्वये मे. सिध्दिविनायक मायनिंग करिता भागीदार श्री. संजय वसत आग्रे व सी. संजना संजय आग्रे मु. पो. फोडाघाट, ता. कणकवली, जि. सिंधुदुर्ग यांचेकडून महाराष्ट्र जमिन महसूल अधिनियम १९६६चे कलम ४८ (७) नुसार बाजारभावाच्या पाच पट दंड रु. ३०,००,७३,२६०/- एवढा दंडाचा आदेश पारित करण्यात आलेला होता. सदर आदेशावर मा. उपविभागीय अधिकारी, कण्कवली यांचेकडे अपील दाखल केलेले होते. मा. उपविभागीय अधिकारी, कणकवली यांनी सदर अपील फेटाळ्यात आलेले होते. १३.०४.२०२३ रोजी दिलेल्या आदेशाविरुध्द मा. अपर जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग यांचेकडे अपील करण्यात आलेले होते. मा. अपर जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग यांचेकडील खनिकर्म अपील क्र. ०१/२०२३, दिनाक १२/०९/२०२३ अन्वये अपील अमान्य करणेत आलेले आहे. त्यानंतर अप्पर आयुक्त यांच्याकडे अपील करण्यात आले होते. त्यावर जिल्हाधिकारी यांना फेर चौकशी करण्याचे आदेश दिले होते. उत्खनन व साठा असलेले असे एकूण १,२१,९८१ मे टन एवढया परिमाणाचे सिलिका सेंड आणि क्वार्टझाईट गौणखनिज अवैध असल्याने बाजारभावाच्या पाच पट ३०,००,७३,२६0 दंड तत्कालीन तहसीलदार यांच्याकडून आकारण्यात आला होता. सदर मिळकतील खाणपट्टयामधून आतापर्यंत विक्री केलेले तसेच सदयस्थितीमध्ये खाणपट्टानध्ये साठा स्वरुपात असलेले असे एकूण १,२१,९८१ मे टन एवढ्या परिमाणाचे सिलिका सँड आणि क्वार्टझाईट हे गौणखनिज अवैध असल्याने चालू बाजारभावप्रमाणे महाराष्ट्र जमिन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ४८ (७) नुसार कारवाई करणेबाबत कळविण्यात आलेले होते. त्यानुसार फेर चौकशी अंती मे. सिध्दिविनायक मायनिंग करिता भागीदार श्री. संजय वसत आग्रे व सी. संजना संजय आग्रे मु. पो. फोडाघाट, ता. कणकवली, जि. सिंधुदुर्ग यांचेकडून महाराष्ट्र जमिन महसूल अधिनियम १९६६चे कलम ४८ (७) नुसार बाजारभावाच्या पाच पट दंड रु. ३०,००,७३,२६०/- एवढा दंडाचा आदेश पारित करण्यात आलेला आहे. या पूर्वीच्या तहसीलदार यांनी दिलेला आदेश कायम करत तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांनी 9 जुलै 2024 रोजी हे आदेश दिलें आहेत. हा निर्णय मान्य नसेल तर 60 दिवसात उपविभागीय अधिकारी यांच्याकडे अपील करता येणार आहे. या निर्णया मुळे जिल्ह्यात मायनींग लॉबीमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

दिगंबर वालावलकर/ कणकवली

error: Content is protected !!