आचरा पारवाडी,कालावल नद्या धोक्याच्या कक्षेतमहसूल, पोलीसखाते सतर्क


रविवार रात्री पासून मुसळधार पडणारया पावसामुळे आचरा पारवाडी,कालावल नद्या धोक्याच्या कक्षेत आल्या असून नदिलगतची घरांना धोका निर्माण झाला होता. मात्र सोमवार सकाळ नंतर पावसाने उसंत घेतल्यामुळे संभाव्य धोका टळला.याबाबत मंडल अधिकारी अजय परब तलाठी संतोष जाधव, पोलीस नाईक मनोज पुजारे यांनी पुरसदृश्य स्थिती भागात पहाणी करुन संबंधितांना सावधगिरी च्या सुचना दिल्या.
आचरा पारवाडी नदीच्या देवगड किनारया बाजूने मुळये यांच्या घराला नदीच्या पाण्याचा वेढा पडला होता. पारवाडी येथील केदार शिर्के,साळसकर आदींच्या घरालगत नदीचे पाणी आले होते. तर चिंदर लब्दे वाडीभागातही काही ठिकाणी अंगणात पाणी आल्याच्या घटना घडल्या होत्या.आता देवगड रस्त्यावर कावले हॉटेल लगतच्या नाल्यालापूर आल्याने रस्त्यावरुन पाणी वाहू लागल्याने वाहतूकीस काही काळ अडथळा निर्माण झाला होता. मात्र सकाळी नऊ नंतर पावसाने उसंत घेतल्यामुळे पाणी ओसरायला लागेल. त्यामुळे संभाव्य धोका टळला

खाडी किनारया लगतची भातशेती धोक्यात
आचरा पारवाडी कालावल नद्या दुथंडीभरुन वाहु लागल्या ने खाडीकिनारया लगतची भातशेती धोक्यात आली आहे. पाणी शेतीत असेच साचून राहिल्यास शेती कुजण्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत.

error: Content is protected !!