खारेपाटण येथील पुरस्थितीग्रस्तांच्या मदतीसाठी सरपंच प्राची इस्वलकर ऍक्शन मोड वर

नुकसानी ची पाहणी करत नागरिकांना दिला दिलासा

खारेपाटण येथील नुकसानग्रस्तांची पंचयादी नोंदविण्याचे काम सुरु

खारेपाटण येथे काल मुसळधार पावसाने पुरस्थिती निर्माण झाली होती. खारेपाटण मधील अनेक रस्ते पाण्याखाली गेले होते.व्यापारांना ही या पुराचा फटका बसला आहे.. तसेच खारेपाटण मच्छिमार्केट येथील मच्छि विक्रेत्यांना देखील पुराचा फटका बसला आहे अनेक कोंबड्या पुराच्या पाण्यात दगावल्या आहेत. तसेच काही ठिकाणी लाईट पोल वर झाडें पडून देखील विजेच्या पोलांचे ही नुकसान झाले आहे.भात शेती पुराच्या पाण्यात असल्याने भात शेतीचे ही बऱ्याच प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच पुराचे पाणी खारेपाटण बाजारपेठेत घुसल्याने पुराच्या पाण्यासोबत आलेला कचरा हा बाजारपेठ रस्त्यावर आलेला आहे.तो कचरा देखील ग्रामपंचायत च्या घंटा गाडी मार्फत साफ करण्यात येत आहे.तसेच विजवितरण कर्मचारी, आरोग्य विभागाची टीम देखील पुरस्थीतीत नुकसान ग्रस्त परिसरात कार्यरत आहेत.सरपंच प्राची इस्वलकर यांनी या सर्व नुकसानी ची पाहणी करून नुकसानग्रस्थ लोकांना दिलासा दिला. व सर्कल ऑफिसर तलाठी,ग्रामसेवक या प्रशासकीय यंत्रनेला सोबत घेऊन नुकसान झालेल्या लोकांची पंचनामा करून पंचयादी करण्यात येत आहे.त्याच्या सोबत जि. प. सदस्य बाळा जठार,खारेपाटण उपसरपंच महेंद्र गुरव, सर्कल ऑफिसर -बावलेकर, तलाठी -जैनवार,ग्रामसेवक -वेंगुर्लेकर, कृषिधिकारी -सागर चव्हाण, आरोग्य सहाय्यक -के. एस. वानोळे, सुधाकर ढेकणे,इस्माईल मुकादम, किरण कर्ले,शेखर शिंदे व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.तसेच खारेपाटण मधील काही विहिरी या पुराच्या पाण्याखाली गेल्याने त्या विहिरीतील पाणी शुद्धिकरणाचे काम देखिल आरोग्य विभाग आणि ग्रामपंचायत कर्मचारी सोबत करत आहेत.आम. नितेश राणे यांनी स्वतः लक्ष पूर्वक खारेपाटण च्या पुराची दखल घेऊन वेळोवेळी रात्री उशिरा पर्यंत प्रशासकीय यंत्रनेला खारेपाटण येथे पाठवून खारेपाटण पूर परिस्थितीत सतर्क राहण्याचे आदेश देखील दिले. नितेश राणे यांचे सरपंच प्राची इस्वलकर यांनी आभार मानले.खारेपाटण पुरस्थिती नुकसान ग्रस्त लोकांना प्रशासनाकडून मदत मिळावी असे आवाहन सरपंच प्राची इस्वलकर यांनी केले आहे.

error: Content is protected !!