भ्रष्टाचार व बेनामी ठेकेदारीच्या विरोधात दडपशाही झुगारून लढाई सुरू ठेवणार!

ठाकरे शिवसेनेचे नाटळ जि. प. उमेदवार उत्तम लोके यांचा झंजावती प्रचार दौरा
शिवडाव मध्ये प्रचारात मतदारांची मोठी गर्दी
नाटळ जिल्हा परिषद मतदार संघात गेले अनेक वर्ष सुरू असलेली दडपशाही व भ्रष्टाचार हा झुगारून यावेळी मतदार मला मोठ्या मताधिक्याने विजयी करतील. केलेले रस्ते दरवर्षी न करता एकदा काम केल्यावर ते कसे टिकाऊ राहील यासाठी मी प्रयत्न करीन. ठेकेदारीसाठी काम न करता जनतेच्या सोयीसाठी काम करण्यावर माझा भर असेल असे उद्गार नाटोळ जिल्हा परिषद मतदार संघाचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मशाल चिन्हाचे उमेदवार उत्तम लोके यांनी काढले. शिवडाव गावामध्ये त्यांनी प्रचार रॅली काढली. यावेळी अनेक भागांमध्ये मतदार स्वतःहून या प्रचारात सहभागी झाले. याप्रसंगी शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख नीलम पालव , महिला आघाडी तालुकाप्रमुख माधवी दळवी, दिव्या साळगावकर, विभागप्रमुख अवसरे,शिवडाव सरपंच नितेश भिसे,
युवासेना शाखाप्रमुख शुभम गावकर पंचायत समिती उमेदवार पूजा गावकर शिवसेना शाखाप्रमुख गणेश शिवडावकर युवासेना शाखाप्रमुख विजय गावकर शिवसेना नाटळ शाखाप्रमुख स्वप्नील मराठे, शिवडाव उपसरपंच सायली तेली, उपशाखाप्रमुख सोमा घाडीगांवकर , काशिनाथ गावकर, महेश शिरसाठ, बाबू गावकर रवी गुरव , राजन लोके सागर लोके, निलेश परब, नामदेव गावकर, रमाकांत गावकर, पल्लवी गुरव, रोशन गुरव, श्रीराम गुरव , दयानंद गुरव, संदीप गावकर, शिवप्रसाद गावकर, काशिनाथ गावकर,प्रवीण गावकर राकेश पंगम, प्रशांत कदम आदी उपस्थित होते.





