कळसुली जि. प. मधून प्राची आमडोसकर व पं. स. मधून मनोहर मालंडकर यांना विजयी करण्याचा निर्धार!

कळसुलीमध्ये प्रचार फेरीला उस्फूर्त प्रतिसाद
मतदार स्वतः झाले प्रचार रॅलीमध्ये सहभागी
कळसुली जिल्हा परिषद मतदार संघाच्या ठाकरे शिवसेनेच्या उमेदवार प्राची आमडोसकर व कळसुली पंचायत समितीचे उमेदवार मनोहर मालंडकर यांच्या प्रचाराला कळसुली मध्ये उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. या प्रचारफेरी दरम्यान मतदारसंघातून ठाकरे शिवसेनेच्या दोन्ही उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा असे आवाहन करण्यात आले. मतदारांनी देखील या प्रचार फेरीत स्वतः सहभागी होत आमडोसकर व मालंडकर या दोन्ही उमेदवारांना निवडून आणण्यासाठी यावेळी मतदान करण्याची ग्वाही दिल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी चंदू परब, श्री नंदकिशोर परब कळसुली ग्रामपंचायत सदस्य , श्री नरेश दळवी,श्री सुशांत दळवी, मधुकर चव्हाण, संतोष मुरकर, रामकृष्ण परब, संतोष सुतार, शैलेश. दळवी, बाबू नार्वेकर, राजेश परब, श्री अनिल दळवी, प्रकाश पाताडे, रोहित राणे, अनंत राणे, रवी परब , अक्षय वायंगणकर आधी उपस्थित होते.





