खारेपाटण पं.स. मतदार संघात महायुती चे उमेदवार जिल्ह्यात एक नंबरच्या मताधिक्याने निवडून येणार: मंगेश गुरव, शिवसेना तालुकाप्रमुख कणकवली

गुरुप्रसाद शिंदे महायुतीच्या कार्यकर्त्यांसह डोअर टू डोअर जाऊन घेतायत मतदारांच्या गाठीभेटी
खारेपाटण पंचायत समिती मतदार संघातुन महायुतीचे उमेदवार गुरुप्रसाद शिंदे हे निवडणुक रिंगणात असून त्यांचा झंझावाती प्रचार सध्या खारेपाटण मतदार संघात सुरु आहे. उमेदवार गुरुप्रसाद शिंदे हे मतदार संघातील घरोघरी जाऊन मतदारांच्या भेटी घेत आहेत त्यांना मतदारांकडून उत्स्फूर्त पाठिंबा मिळत असून खारेपाटण पंचायत समिती मतदार संघात गुरुप्रसाद शिंदे हे जिल्ह्यात एक नंबरच्या मताधिक्याने भरघोस मतांनी निवडून येणार असल्याचा विश्वास शिवसेना कणकवली तालुकाप्रमुख मंगेश गुरव यांनी व्यक्त केला आहे.





