अजितदादांना श्रद्धांजली वाहण्यासाठी उद्या कणकवलीत शोकसभा.

सर्वपक्षीय आणि सामाजिक संस्थान्नी उपस्थित राहावे – राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबीद नाईक यांचे आवाहन

राष्ट्रवादीचे नेते व माजी उपमुख्यमंत्री कै.अजितदादा पवार यांचे विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले.त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सोमवार दिनांक 2 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता कणकवली कॉलेजच्या एचपीसीएल सभागृहात शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे.महाराष्ट्राचे कर्तबगार व सर्व सामान्यांच्या प्रश्नांची जाण असलेले नेते म्हणून कै.अजितदादा पवार ओळखले जात होते.मात्र त्यांच्या आकस्मिक अपघाती मृत्यूमुळे महाराष्ट्राचे कधीही भरून न येणारे एवढे नुकसान झाले आहे.म्हणूनच अजित दादांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या शोक सभेत सर्वपक्षीयांनी व सामाजिक संस्था यांनी सहभागी व्हावे असे आवाहन राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी केले आहे.

error: Content is protected !!