कणकवली तालुका पत्रकार संघातर्फे 13 जुलै रोजी पत्रकार पाल्यांचा गुणगौरव

पत्रकारांनी उपस्थित राहण्याचे आवाहन

कणकवली तालुका पत्रकार संघातर्फे तालुक्यातील पत्रकारांच्या गुणवंत पाल्यांचा गुणगौरव समारंभ शनिवार 13 जुलै रोजी सकाळी 10 ते दु. 1 वा. या वेळेत कणकवली पंचायत समितीच्या परमहंस भालचंद्र महाराज सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाला कणकवलीचे तहसिलदार दीक्षांत देशपांडे, कणकवली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. ज्या पत्रकारांनी आपल्या पाल्यांची नाव नोंदणी केेली आहे, त्या सर्वांनी आपल्या पाल्यांसहित तसेच तालुक्यातील सर्व पत्रकार बांधवांनी कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन कणकवली तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष अजित सावंत, सचिव माणिक सावंत, खजिनदार योगेश गोडवे व कार्यकारिणीच्यावतीने करण्यात आले आहे.

कणकवली प्रतिनिधी

error: Content is protected !!