आम. नितेश राणे यांच्या माध्यमातून खारेपाटण येथे बैठक व्यवस्थेसाठी लोखंडी बेंच उपलब्ध

सरपंच प्राची इस्वलकर यांच्या उपस्थितीत बेंच चे लोकार्पण संपन्न
खारेपाटण ग्रामपंचायत च्या मागणीवरून खारेपाटण गावातील सार्वजनिक ठिकाणी बैठक व्यवस्था उपलब्ध करावी जेणेकरून, जेष्ठ नागरिक, महिला, मुले, विद्यार्थि यांना त्याचा फायदा व्हावा यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने मागणी करण्यात आली होती. त्यानुसार आम. नितेश राणे यांच्या प्रयत्नातून खारेपाटण गावाकरिता बैठकीसाठी लोखंडी बेंच उपलब्ध झाले होते. त्याचे लोकार्पण दि 7/7/24 रोजी खारेपाटण सरपंच प्राची इस्वलकर, खारेपाटण उपसरपंच महेंद्र गुरव व ग्रामपंचायत सदस्य यांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी सदस्य -सुधाकर ढेकणे, जयदीप देसाई, मनाली होनाळे, क्षितिजा धुमाळे, दक्षता सुतार, अस्थाली पवार व रिक्षा संघटना चे कर्मचारी व मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ उपस्थित होते.बैठक व्यवस्थेसाठी लोखंडी बेंच उपलब्ध झाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.