ठाकरे गटाचे उपनेते गौरीशंकर खोत खासदार राणेंच्या भेटीला

खासदार म्हणून निवडून आल्याबद्दल दिल्या शुभेच्छा

ठाकरे गटाच्या उपनेत्यांने राणेंची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात खळबळ

रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघाचे खासदार म्हणून विजयी झाल्यानंतर नारायण राणे यांचे एकेकाळीचे निकटवर्तीय मानले जाणारे व सध्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते असणारे गौरीशंकर खोत यांनी खासदार नारायण राणे आमदार नितेश राणे यांची त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेत त्यांना शुभेच्छा दिल्या. गौरीशंकर खोत हे एकेकाळी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जात होते. राणीच्या किचन कॅबिनेट मधील काही नावांपैकी ते एक नाव होते. मात्र काही वर्षांपूर्वी त्यांनी राणें पासून फारकत घेत उद्धव ठाकरे यांची साथ दिली होती. नारायण हे नुकतेच लोकसभा निवडणुकीत रत्नागिरी सिंधुदुर्ग मधून विजयी झाल्यानंतर त्यांना शुभेच्छा देत असतानाच आमदार नितेश राणे यांचा उद्या होत असलेला वाढदिवस या निमित्ताने देखील श्री खोत यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी नीलम राणे यादेखील उपस्थित होत्या. शिवसेना उपनेते या पदावर असलेल्या गौरीशंकर खोत यांनी ही भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून, याबाबत शिवसेना ठाकरे गटामध्ये हलकल्लोळ उडाला आहे. दरम्यान या भेटीचे वेगवेगळे राजकीय अर्थ निघत असून लवकरच त्याचा उलगडा होण्याची शक्यता देखील आहे.

दिगंबर वालावलकर/ कणकवली

error: Content is protected !!