‘कोकण नाऊ कणकवली महोत्सवाचा’ आज ग्रँड फिनाले

जलवा डान्स शो ने रंगणार सांगता रात्र.

कणकवली/मयूर ठाकूर

गेल्या काही दिवसांपासून कणकवली शहरात आनंदाचा आणि उत्साहाचा पाऊस पाडणाऱ्या ‘कोकण नाऊ कणकवली महोत्सवाचा’ आज रविवार, ८ मार्च रोजी सांगता समारंभ होत आहे.उत्सवाच्या शेवटच्या दिवशी आयोजित करण्यात आलेल्या भव्य ‘जलवा’ डान्स शोमुळे आज संपूर्ण शहराचे लक्ष कोकण नाऊ कणकवली महोत्सवाकडे लागले आहे.महोत्सवाचा शेवटचा दिवस असल्याने आज अभूतपूर्व गर्दी पाहायला मिळेल.तर आजच्या संध्याकाळी होणारे मुख्य आकर्षण म्हणजे ‘जलवा’ डान्स शो! महाराष्ट्रातील नामवंत डान्सर्सच्या अंगावर शहारे आणणाऱ्या परफॉर्मन्समुळे ही रात्र अविस्मरणीय ठरणार आहे.
ऑटोमोबाईल, फर्निचर, हँडलूम आणि लाइफस्टाईल स्टॉल्सवर आज शेवटच्या दिवशी ग्राहकांसाठी विशेष सवलती आणि ऑफर्स उपलब्ध आहेत.खवय्यांसाठी विविध प्रादेशिक पदार्थांची मेजवानी मिळेल.
लहानांपासून मोठ्यांपर्यंत असलेले ‘फन फेअर’ आणि उंचच उंच पाळण्यांचा आनंद घेण्यासाठी महोत्सवा दरम्यान आज संधी आहे. “कणकवलीकरांनी दिलेल्या भरघोस प्रतिसादाबद्दल आम्ही ऋणी आहोत.आजचा सांगता समारंभ अधिक दिमाखदार व्हावा यासाठी आम्ही सज्ज आहोत,तरी सर्व रसिकांनी सहकुटुंब या सोहळ्याला उपस्थित राहावे,”असे आवाहन कोकण नाऊ चॅनेल च्या वतीने करण्यात आले आहे.

ठिकाण: उपजिल्हा रुग्णालयासमोरील मैदान, कणकवली.

“चला तर मग, आजची संध्याकाळ करूया अधिक रंगतदार… फक्त कोकण नाऊ कणकवली महोत्सवात!”

error: Content is protected !!