फोंडाघाटचा अमित कदम ठरला स्वस्तिक श्री स्वास्तिक श्री 2026 चा मानकरी

कुडाळचा ज्ञानेश्वर आळवे ठरला स्वस्तिक श्री मेन फिजिकचा मानकरी

महाराष्ट्र बॉडी बिल्डर्स अससोसिएशन संलग्न सिंधुदुर्ग बॉडी बिल्डर्स अससोसिएशनच्या मान्यतेने स्वस्तिक प्रतिष्ठान कुडाळ आयोजित ड्रुग्स मुक्त सिंधुदुर्ग अभियान अंतर्गत सिंधुदुर्गतील मानाची भव्य जिल्हा स्तरीय स्वस्तिक श्री 2026 हि स्पर्धा प्रेक्षकांच्या उदंड प्रतिसादात संपन्न झाली. फोंडाघाटचा अमित कदम स्वस्तिक श्री स्वास्तिक श्री 2026 चा मानकरी ठरला तर कुडाळचा ज्ञानेश्वर आळवे याने स्वस्तिक श्री मेन फिजिकचा किताब पटकावला. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कानकोपरातून आलेले बॉडी बिल्डर्स आपली कसलेली पिळदार शरीर विविध पोझेसच्या माध्यमातून सादर करून उपस्थित क्रीडा प्रेमी रसिक प्रेक्षकांची मने जिंकली.
स्वस्तिक प्रतिष्ठान कुडाळच्या वतीने राज्यस्तरीय स्पर्धाला लाजवेल असे भव्य आयोजन पाहून जिल्ह्यातील शरीर सौष्ठव क्षेत्राला जणू चैत्यन्य प्राप्त झाले होते.
स्पर्धेचे उदघाटन कुडाळ नगरपंचायत नगराध्यक्ष प्राजक्ता शिरवलकर यांच्या हस्ते झाले. यावेळी व्यासपिठावर कुडाळ पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम, बॅरिस्टर नाथ पै चेअरमन उमेश गाळवणकर, डाॅ. नालंदा काजरेकर- परब , राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अमित सामंत, काँग्रेस तालुकाध्यक्ष अभय शिरसाट, प्रसाद रेगे, स्पर्धेचे प्रमुख पंच रामकृष्ण चितळे, आंतरराष्ट्रीय पंच, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार शरीर सौष्ठव विजेते महाराष्ट्र श्री व भारत श्री विजेते विजय मोरे, महाराष्ट्र श्री विजेते अंतर राष्ट्रीय पंच तथा सचिव सिंधुदुर्ग बॉडी बिल्डिंग अससोसिएशन किशोर शांताराम सोन्सुरकर आदी मान्यवर उपस्थितीत होते.
या प्रसंगी कुडाळ पोलीस निरीक्षक श्री मगदुम यांनी स्वस्तिक प्रतिष्ठान वतीने तरुणांना दिशादर्शक अश्या शरीर सौष्ठव स्पर्धेचे आयोजन केले बद्दल अभिनंदन केले. तसेच ड्रग मुक्तसिंधुदुर्ग अभियान अंतर्गत सदर स्पर्धा आयोजन केल्याबद्दल समाधान व्यक्त केले. पोलीस प्रशासनला एक प्रकारे असे उपक्रम सहायभूत आहेत जेणे करून तरुण व्यसन व व्यसन मुळे घडणारे विविध गुन्हे या पासून अलिप्त राहतील.
श्री अमित सामंत यांनी या उपक्रमाचे कौतुक करून कुडाळमध्ये या मंडळ वतीने दरवर्षी विविध समाज उपयोगी उपक्रम राबविले जातात कुडाळ मधील शिस्तबद्ध नियोजन पूर्वक कार्यक्रम राबविणारे स्वस्तिक प्रतिष्ठान या मंडळ सर्व कार्यकर्त्याचे अभिनंदन केले. कार्यक्रम अध्यक्ष प्राजक्ता शिरवलकर यांनी कुडाळ शहरातील तरुण वर्गासाठी हा उपक्रम स्तुत्य आहे त्या बद्दल अभिनंदन केले.
मंडळाचे संस्थापक धीरज परब यांनी स्वस्तिक प्रतिष्ठानच्या विविध उपक्रमची माहिती देऊन कुडाळ मधील विविध घटकातील लोकांनी एकत्रित येऊन या मंडळाच्या माध्यमातून आपली सामाजिक बांधिलकी जपत आहेत. प्रमुख पंच श्री रामकृष्ण चितळे याने स्पर्ध दिमाखदार आयोजन केले बद्दल अभिनंदन केले व हि स्पर्धा अखंड सुरु ठेवण्याबाबत आवाहन केले. व स्पर्धा आयोजन बाबत महाराष्ट्र बॉडी बिल्डर्स अससोसिएशन वतीने धीरज परब यांचा सत्कार करण्यात आला.
स्पर्धेसाठी आंतरराष्ट्रीय पंच रामकृष्ण चितळे, शिवछत्रपती पुरस्कार विजेते राष्ट्रीय पंच विजय मोरे, महाराष्ट्र कामगार श्री विजेते आंतरराष्ट्रीय पंच किशोर सोन्सूरकर,महाराष्ट्र श्री गटविजेते व राज्य पंच सुधीर हळदणकर, ज्यु महाराष्ट्र श्री विजेते राज्य पंच सौरभ वारंग, सिंधुदुर्ग श्री विजेते विक्रांत गाड, फोंडाघाट श्री विजेते राज्य पंच महेश परब, कुडाळ सिंधुदुर्ग श्री गट विजेते राज्य पंच महेश परब, आदर्श प्रशिक्षक पुरस्कार विजेते राज्य पंच हेमंत नाईक, राज्य स्तरीय खेळाडू सिंधुदुर्ग श्री गट विजेते कुणाल पांचाळ, आंतरराष्ट्रीय खेळाडू अंकित सोन्सूरकर यांनी पंच म्हणून काम पहिले.

स्पर्धेचा निकाल

५५ केजी गट – शुभम हळदिवे प्रथम क्रमांक, पराग बोंद्रे द्वितीय क्रमांक, प्रथमेश वाघमारे तृतीय क्रमांक, अंकित जाधव चतुर्थ क्रमांक, प्रणव वाळके पाचवा क्रमांक, अमोल तेली साहावा क्रमांक.
६० केजी गट – भूषण गवंडी प्रथम क्रमांक, चिन्मय मळगावकर तिसरा क्रमांक, आकाश नाईक चौथा क्रमांक, मंजीत मुळीक पाचवा क्रमांक, प्रथमेश पाटकर सहावा क्रमांक.
६५ केजी गट – गणेश सातार्डेकर पहिला क्रमांक, गणेश सरवंजे दुसरा क्रमांक, मेघश्याम धुरी तिसरा क्रमांक, बळीराज पाटकर चौथा क्रमांक, संदीप सडवेलकर पाचवा क्रमांक, शेअरबहादुर भोगटे सहावा क्रमांक.
७० केजी गट – जयप्रकाश नार्वेकर प्रथम क्रमांक, बंटी सारंग द्वितीय क्रमांक, ज्ञानेश्वर आळवे तृतीय क्रमांक, मंगेश घोगळे चतुर्थ क्रमांक, अदनाम करोल पाचवा क्रमांक, साहिल तोरस्कर सहावा क्रमांक.
७० किलो पेक्षा जास्त गट – अमित कदम प्रथम क्रमांक, सौरभ चव्हाण द्वितीय क्रमांक, महादेव पंदारे तृतीय क्रमांक, हेमंत चव्हाण चतुर्थ क्रमांक.
मेन फिजिक – ज्ञानेश्वर आळवे प्रथम क्रमांक, शुभम हळदिवे द्वितीय क्रमांक, हितेंद्र कदम तृतीय क्रमांक, पराग बोंद्रे चतुर्थ क्रमांक, वेदांत केरकर पाचवा क्रमांक.
महाराष्ट्र बॉडी बिल्डर्स असोसिएशन आयोजित महाराष्ट्र श्री 2026 साठी सिंधुदुर्ग जिल्हा संघ निवड चाचणी या निमित्ताने संपन्न झाली. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सचिन गुंड, प्रथमेश धुरी, जगन्नाथ गावडे, अभिजित गोवेकर, सुशांत परब, भुषण राणे, चेतन राऊळ, यतिन माजगावकर, अमर अणसुरकर यांच्यासह अन्य सदस्य्नी विशेष परिश्रम घेतले.

error: Content is protected !!