साकेडीमध्ये कृषी दूतांचे करण्यात आले स्वागत

कै.राजाराम मराठे कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा समावेश

डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, संलग्न कै.राजाराम मराठे कृषी महाविद्यालय पदवीच्या चतुर्थ वर्षातील कृषिदुतांचे साकेडी येथे स्वागत करण्यात आले. ग्रामीण कृषी जागरुकता व कृषी औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रम अंतर्गत कृषी दुतांची टीम ही शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहे.
बारा आठवडे चालणाऱ्या या कार्यक्रमात विविध प्रकारच्या कृषी तंत्रज्ञानाची माहिती कृषीदुत देणार आहेत. साकेडी येथे कृषी दुतांचे आगमन प्रसंगी साकेडी गावचेे सरपंच सुरेश साटम हे उपस्थित होते.
कृषी पदवीच्या अभ्यासक्रमाच्या अंतर्गत अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी ग्रामीण कृषी जागरूकता हा प्रात्यक्षिक कार्यक्रम रबावण्यात येतो.या दरम्यान विद्यार्थी प्रत्यक्ष गावामध्ये सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी,शेतकऱ्यांचे जीवनमान,सामाजिक आर्थिक स्तर, साक्षरतेचे प्रमाण,संबंधित गावातील पीक पद्धती,नैसर्गिक संसाधने अशा विविध गोष्टींचा अभ्यास करणार आहेत तसेच माती परीक्षण व पाणी परीक्षण,विविध पिकावरील रोग व किडीचे व्यवस्थापन,हवामान सल्ला,बाजार भाव व आधुनिक तंत्रज्ञान याबद्दल माहिती देणार आहेत.
कृषी औद्योगिक कार्यक्रमांतर्गत शेवटच्या चार आठवड्यामध्ये विद्यार्थी कृषी आधारित व्यवसाय किंवा उद्योगांमध्ये प्रत्यक्ष काम करण्याचा अनुभव
घेणार आहेत.
या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य पी.आर. संते सर,कार्यक्रम अधिकारी प्रा.एस.एस.मोटे सर,व इतर विशेषज्ञ यांचे मार्गदर्शन मिळणार आहे.कृषीदूत कुलभूषण मांगले,रोहित कांबळे,रामा रेडकर,अथर्व निकम,पृथ्वीराज जाधव,सौरव चौकाककर,आर्यन मांगले,रितेश शिंत्रे,संकेत गुरव हे विद्यार्थी कार्यक्रमांतर्गत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी साकेडी गावामध्ये कार्यरत राहणार आहेत.

कणकवली प्रतिनिधी

error: Content is protected !!