आम.नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त चिंचवली येथील प्राथमिक शाळांमध्ये खाऊ वाटप व वृक्षारोपण संपन्न

खारेपाटण भाजपा शक्ती केंद्रप्रमुख सूर्यकांत भालेकर यांच्या सौजन्याने उपक्रम संपन्न

कणकवली विधानसभा मतदार संघाचे कार्यसम्राट आम.नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त आज शनिवार दिनांक 22 जून रोजी खारेपाटण भाजपा शक्ती केंद्रप्रमुख श्री.सूर्यकांत भालेकर यांच्या सौजन्याने चिंचवली गावातील चिंचवली मधलीवाडी, कुरंगवणे भंडारवाडी आणि चिंचवली नं. 1 या प्राथमिक शाळांमधील सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले. तसेच चिंचवली मधलीवाडी या शाळेत वृक्षारोपण करण्यात आले. खारेपाटण हायस्कूलच्या सेवानिवृत्त मुख्याध्यापिका सौ. योगिनी रानडे यांची प्रमुख उपस्थिती या कार्यक्रमासाठी होती. यावेळी सौ. रानडे मॅडम यांनी चिंचवली मधलीवाडी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप देखील केले.
खाऊ वाटपाचा मुख्य कार्यक्रम चिंचवली मधलीवाडी या शाळेत संपन्न झाला.याप्रसंगी भाजपा खारेपाटण शक्ती केंद्रप्रमुख सूर्यकांत भालेकर, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ. साक्षी भालेकर, चिंचवली मधलीवाडी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती सविता पवार, चिंचवली नं 1 शाळेचे मुख्याध्यापक श्री. अमोल तुपविहीरे, चिंचवली मधलीवाडी शाळेचे विषय शिक्षक श्रीमती रेखा डिसले, श्री.अजय गटकळ, उपशिक्षिका श्रीमती कुरणे, अंगणवाडी सेविका श्रीमती दीपिका सुतार, मदतनीस श्रीमती सुरेखा भालेकर, स्वयंपाकी श्रीमती दर्शना गुरव आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते चिंचवली मधलीवाडी शाळेच्या आवारात वृक्षारोपण देखील करण्यात आले.

अस्मिता गिडाळे, खारेपाटण

error: Content is protected !!