कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खारेपाटण NSS, NCC, DLLE, WDC व मराठी विभाग आयोजित जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय खारेपाटण येथे जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. स्त्रीशक्ती ही संस्कृती आणि अस्मिता जपणारी शक्तिशाली साधना आहे. समस्त महिलांचा आदर करण्याच्या उद्देशाने दिनांक ०७ मार्च रोजी जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमात प्रा. वसीम सय्यद यांनी स्त्रीशक्तीचे महत्व सांगून प्रत्येक स्त्री प्रति आदरभाव व्यक्त केला.
प्रा. रश्मी देसाई यांनी महिला या शब्दाच्या अर्थ सांगून, प्रत्येक स्त्रीने आपल्यातली नवनिर्मितीची शक्ती ओळखून आपला विकास साधला पाहिजे असे सांगितले.
अध्यक्षीय मार्गदर्शनात प्राचार्य डॉ. आत्माराम कांबळे यांनी महिला दिनाचा इतिहास सांगितला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजन करण्यासाठी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांमध्ये महिला विषयी आदर आणि जाणीव निर्माण करणारा हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. वसीम सय्यद यांनी केले. तर प्रास्ताविक मराठी विभाग प्रमुख प्रा. सौ. रश्मी देसाई यांनी केले. कार्यक्रमाचे आभार सुयश मोरे याने मानले. अश्या प्रकारे हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.





