महाराष्ट्र राज्य महिला आयोग पुरस्काराने अभिनेत्री अक्षता कांबळी सन्मानित

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते अक्षता कांबळी यांना राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान
मालवणी सम्राज्ञी म्हणून ज्यांची सर्वत्र ओळख आहे, ज्यांनी पुरुषप्रधान संस्कृती मोडीत काढीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिला महिला दशावतार सुरू करून गेली पंधरा वर्षे कला क्षेत्रा बरोबर समाजसेवा करत महिलाना व्यासपीठ उपलब्ध करुन दिले. त्यांच्या या कार्याची दखल महाराष्ट्र राज्य महिला आयोग च्या अध्यक्षा रुपाली ताई चाकणकर व कोकण विभाग अध्यक्षा सुनीता गणगे मुंबई पुणे विभाग प्रमुख लक्ष्मण मानकर यांनी घेतली. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने ७ मार्च २०२६ रोजी पुं ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी (रविंद्र नाट्य गृह) प्रभादेवी मुंबई येथे पुरस्कार प्रधान करण्यात आला. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते अक्षता कांबळी यांना राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.
संपूर्ण महाराष्ट्र मधून विविध क्षेत्रातील महिला पुरस्कार साठी आल्या होत्या त्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातून अक्षता कांबळी पहिल्या मानकरी ठरल्या. रोख रक्कम, सन्मान चिन्ह सन्मान पत्र, मानाची शाल, सावित्रीबाई च पुस्तक, आणि भेट वस्तु असा ह्या पुरस्काराचे स्वरूप आहे. अक्षता कांबळी यांना शासनाचा जिल्हास्तरीय अहिल्याबाई होळकर पुरस्कार ही जाहीर झाला आहे. या दोन्ही पुरस्कारांसाठी सर्व स्तरातून त्याचं कौतुक होत आहे. या पुरस्कारांसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्या महिला व बाल विकास अधिकारी व कर्मचारी यांचे अक्षता कांबळी यांनी मन:पूर्वक आभार मानले.





