साने गुरुजी स्मृतिदिनाच्या निमित्ताने परिसंवादाचे आयोजन

सहभागी होण्याचे गोपुरी आश्रमाचे आवाहन

गोपुरी आश्रम,वागदे, कणकवली च्या वतीने सानेगुरुजी १२५ अभियान चे आयोजन मंगळवार- सानेगुरुजी स्मृतिदिनी दिनांक ११ जून.२०२४ रोजी सायंकाळी ४.०० वाजता मुळ गोपुरी आश्रम येथे करण्यात आले आहे.
सानेगुरुजींच्या १२५ व्या जयंती शताब्दी वर्ष निमित्ताने त्यांनी दिलेल्या आता उठवू सारे रान आता पेटवू सारे रान आणि खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे, ऑयकाॅन सानेगुरुजी,
सानेगुरुजीची लढाऊ वृत्ती,
धर्म निरपेक्षतेचा विचार, प्रकृती कोकणची, सलोखा परिषद,
वैचारिक पर्यटन,
हा विचार घेऊन परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे.
बलसागर भारत होवो ही संकल्पना घेऊन
सर्वांनी या अभियानात सहभागी होऊया. सानेगुरुजीचा धर्म निरपेक्षतेचा विचार पुढे घेऊन जाऊया असे आवाहन अध्यक्ष
डॉ .प्रा. राजेंद्र मुंबरकर, सचिव
विनायक उर्फ बाळू मेस्त्री,
उपाध्यक्ष विजय सावंत,
खजिनदार अमोल भोगले
आणि
सर्व पदाधिकारी व सदस्य, गोपुरी आश्रम वागदे च्या वतीने करण्यात आले आहे.

कणकवली प्रतिनिधी

error: Content is protected !!