विजेच्या लपंडावाने त्रस्त झालेल्या आचरा ग्रामस्थांची वीज वितरणला धडक

चार दिवसात समस्यांचे निराकरण न झाल्यास आंदोलनाचा इशारा.

आचरा प्रतिनिधी

आचरा गावात सबस्टेशन असूनही वारंवार खंडीत होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे संतप्त झालेल्या आचरा ग्रामस्थांनी सोमवारी आचरा बाजारपेठ येथील कार्यालयावर धडक देत विद्यूत मंडळ अभियंत्याना लेखी पत्र देत चार दिवसात विद्यूत समस्यांचे निराकरण न झाल्यास आक्रमक पवित्रा घेण्याचा इशारा दिला.
यावेळी आचरा सरपंच जेरॉन फर्नांडीस, उपसरपंच संतोष मिराशी,त्रिबंक उपसरपंच आशिष बागवे, राजन गांवकर, जयप्रकाश परुळेकर, पंकज आचरेकर,राजन परुळेकर, फ्रफुल्ल नलावडे आदी उपस्थित होते.
आचरा परीसरात गेले काही दिवस वारंवार वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रकार वाढले आहेत. याचा फटका व्यापारी, ग्रामस्थ वर्गाला बसत असून नुकसान सहन करावे लागत होते. यामुळे संतप्त आचरा ग्रामस्थांसमवेत आचरा सरपंच, उपसरपंच यांनी दुपारी आचरा बाजारपेठ येथील विद्यूत कार्यालयावर धडक देत उपस्थित उपकार्यकारी अभियंता अतुल पाटील यांना जाब विचारला. यावेळी वआचरा सबस्टेशनला पुरवठा होणार्या तळेबाजार, विरण लाईनला कायम निर्माण होणाऱ्या समस्यांबाबत पाटील यांना जाब विचारत समस्यांचे चार दिवसात निराकरण न केल्यास आक्रमक पवित्रा घेण्याचा इशारा दिला. यावेळी पाटील यांनी आचरा सबस्टेशन मध्ये बिघाड असून तो कवकरच दुरु करण्याचे पर्यन्त चालू असून सुरळीत विजपुरवठा आचरा ग्रामस्थांना केला जाईल असे सांगत सर्व ते सहकार्य करण्याची ग्वाही दिली.

error: Content is protected !!