नैसर्गिक पर्यावरण संवर्धन आणि मानवता विकास सिंधुदुर्ग या संस्थेकडून जिल्ह्यातील विविध शाळांना नारळी-सुपारीच्या वृक्ष्यांचे वाटप.
कणकवली तालुका पदाधिकारी श्री. पंढरी जाधव,श्री.मयुर ठाकूर,श्री. अतुल दळवी यांचा उपक्रम.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात वृक्ष बँकेची स्थापना.
कणकवली/प्रतिनिधी
नैसर्गिक पर्यावरण संवर्धन आणि मानवता विकास यां संस्थेच्या माध्यमातून विविध ठिकाणी सर्वत्र राज्यभरात वृक्ष बँकेची निर्मिती करण्यात येत आहॆ.या वृक्ष बँकेच्या माध्यमातून सर्वत्र विविध प्रकारची झाडें समाज्यातील दानशूर व्यक्तींकडून एकत्र करून ही विविध ठिकाणी वितरित करण्यात येणार आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात देखील संस्थेचे जेष्ठ पदाधिकारी बापू परब आणि जिल्हा अध्यक्ष प्रदीप सावंत यांच्या मार्गदर्शनातून कणकवली तालुक्याच्या वतीने वृक्ष बँक स्थापन करण्यात आली आहॆ. यां वृक्ष बँकेच्या माध्यमातून संस्थेचे जिल्हा संघटक पंढरी जाधव, तालुका युवाध्यक्ष मयूर ठाकूर आणि कणकवली तालुका अध्यक्ष अतुल दळवी यांच्या माध्यमातून पन्नास नारळी सुपारीच्या झाडांचे आज वितरण करण्यात आले. संस्थेच्या यां अभिनव उपक्रमाचे सर्व स्थरातून कौतुक होत आहे.