खासदार नारायण राणेंच्या अभिनंदनाचा शिंदे गटाचा बॅनर कणकवलीत फाडला
कणकवली छत्रपती शिवाजी महाराज चौकातील घटना
बॅनर वरील किरण सामंत, संजय आंग्रेंचा फोटो फाडला
कणकवली शहरात महायुतीचे उमेदवार खासदार नारायण राणे यांच्या विजयाबद्दल त्यांचे अभिनंदन करणारा लावलेला शिवसेना शिंदे गटाचा बॅनर अज्ञातांकडून फाडण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौकात मराठा मंडळ रोडवर हा बॅनर लावण्यात आला होता. या बॅनरवर नवनिर्वाचित उमेदवार नारायण राणे यांच्या मोठया फोटो सहित अभिनंदन करणारे उद्योग मंत्री उदय सामंत यांचे बंधू व लोकसभेसाठी इच्छुक असलेले किरण सामंत व जिल्हाप्रमुख संजय आंग्रे यांचे फोटो या बॅनर वर होते. हा बॅनर फाडतेवेळी किरण सामंत व संजय आंग्रे यांचे फोटो असलेला भाग फाडण्यात आला आहे. त्यामुळे या घटनेची उलट सुलट चर्चा सुरू झाली आहे.
दिगंबर वालावलकर /कणकवली