आडवली येथील खुल्या नृत्य स्पर्धेत मृणाल सावंत प्रथम

प्रतिनिधी । कुडाळ : मालवण तालुक्यातील आडवली येथील खुल्या जिल्हास्तरीय एकेरी नृत्य स्पर्धेत पिंगुळीची मृणाल सावंत विजेती ठरली. दि बुध्दिस्ट सोसायटी ऑफ इंडिया भारतीय बौध्द महासभा अंतर्गत बौध्द उत्कर्ष मंडळ आडवली व मुंबई मंडळ , माता रमाई महिला मंडळ आयोजित संयुक्त जयंती महोत्सवअंतर्गत खुल्या जिल्हास्तरीय एकेरी नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेत द्वितीय क्रमांक नेहा जाधव, तृतीय क्रमांक विश्लेषा मंडलिक यांनी मिळविला. विजेत्यांना अनुक्रमे रोख रू सात हजार रु पाच हजार रु तीन हजार व भव्य चषक मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. स्पर्धेचे परीक्षण नृत्य दिग्दर्शक राहुल कदम व नृत्य दिग्दर्शक अतुल जाधव यांनी केले. बक्षीस वितरण प्रसंगी अध्यक्ष निलेश कदम, सुधीर कदम, महिला मंडळ अध्यक्षा सान्वी कदम, अक्षय कदम, राजेंद्र कदम,महेश कदम, सुदेश कदम, सचिन कदम, सुधीर कदम, रेणुका कदम, सजय कदम, मनिष कदम, सुर्यकांत कदम, सुदर्शन कदम, मंगेश आचरेकर, चंद्रकांत कदम, मोहन कदम, सुनिल जाधव, चंद्रकला कदम, सूगंधा जाधव, छाया कदम, संघमित्रा कदम, संजीवनी कदम, संजना कदम, सुहानी आचरेकर, सुप्रिया कदम, सुश्मिता कदम, मनिषा कदम, शितल जाधव, मनिषा आचरेकर, सूरेश कदम, संतोष कदम, प्रशांत कदम, सुरेश कदम, सिध्दार्थ जाधव, आनंदी जाधव, नागसेन आचरेकर, सारीका कदम, स्नेहा कदम, तेजस कदम, ऋषिकेश जाधव, सायली जाधव, आदर्श जाधव, अर्पिता कदम, संचित कदम आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. निवेदन सिने नाट्य अभिनेता निलेश पवार यांनी केले.
प्रतिनिधी, कोकण नाऊ, कुडाळ.





