तळवडे येथील नृत्य स्पर्धेत पिंगुळीची मृणाल सावंत विजेती
लहान गटात निधी खडपकर प्रथम
श्री निम्बेश्वर सटवी देवस्थान, खालची धुरीवाडी यांचे आयोजन
प्रतिनिधी । कुडाळ : देवगड तालुक्यातील श्री निम्बेश्वर सटवी देवस्थान, खालची धुरीवाडी तळवडे, आयोजित श्री सत्यनारायण महापूजेनिमित्त घेण्यात आलेल्या खुल्या एकेरी नृत्य स्पर्धेत खुल्या गटात पिंगुळीची मृणाल सावंत तर लहान गटात सावंतवाडीची निधी खडपकर विजेत्या ठरल्या
खालची धुरीवाडी तळवडे-देवगड आयोजित भव्य जिल्हास्तरीय (सोलो) रेकार्ड डान्स स्पर्धा शनिवारी रात्री श्री निम्बेश्वर सटवी देवस्थान, खालची धुरीवाडी तळवडे येथे पार पडल्या. या स्पर्धेत मोठा गट द्वितीय अनुष्का कांदळगावकर तृतीय सिध्दी धुरी यांनी मिळविला. पहिल्या तीन विजेत्यांना अनुक्रमे रु आठ हजार रु चार हजार रु दोन हजार व आकर्षक चषक देण्यात आला. लहान गट (१३ वर्षाखालील) द्वितीय क्रमांक साईशा धुरी, तृतीय सांन्वी बाणे यांनी मिळविला. विजेत्यांना रू पाच हजार रु तीन हजार रु दोन हजार व आकर्षक चषक देण्यात आला.
स्पर्धेचे परीक्षण कथक विशारद सुप्रिया ढोके, आकाश सकपाळ यांनी केले. बक्षीस वितरण प्रसंगी सरपंच गोपाळ रुमडे, उपसरपंच भाग्यश्री धुरी, सचिन धुरी, योगेश धुरी, सुमित ढोके, ऋत्विक धुरी, अनिल धुरी, प्रकाश बाळा सावंत, सुहास धुरी, प्रमोद धुरी, दिलीप धुरी, वर्षा रमेश धुरी, नरेंद्र धुरी, स्वप्निल धुरी ग्रामस्थ आदी उपस्थित होते. निवेदन प्रसाद दुखंडे यांनी केले.
प्रतिनिधी, कोकण नाऊ, कुडाळ.