बाजारपेठत तातडीने वन वे करा, नाहीतर….

माजी जि प सदस्य संजय भोगटे यांचा इशारा
निलेश जोशी । कुडाळ : कुडाळ शहरात गांधी चौक नार्वेकर बेकरी ते बाजारपेठ या मार्गावर एकदिशा वाहतूकीचा निर्णय होवून तशा प्रकारचे फलक नगर पंचायत मार्फत लावलेले आहेत. परंतु अमलबजावणी होताना दिसत नाहीं. परिणामी सतत ट्रॅफिक जाम होत असते. त्यामुळे याठिकाणी एकदिशा मरागची अंमलबजावणी तात्काळ करावी अशी मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य संजय भोगटे यांनी केली आहे. तातडीने अंमलबजावणी झाली नाही तर निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा इशारा श्री. भोगटे यांनी दिला आहे. .
कुडाळ नगर पंचायतचे मुख्याधिकारी याना दिलेल्या पात्रात संजय भोगटे पुढे म्हणतात,सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत. कडक उन्हाचा त्रास जनतेला होत आहे. . ट्रॅफिक जॅम झाले की बराच वेळ वाहने उभी ठेवून ट्रॅफिक क्लिअर होण्याची वाट वाहनधारक बघत असतात. त्यामुळे त्या वाहनधारकांना उन्हाचा नाहक त्रास सहन करावा लागतो. तसेच ट्रॅफिक जॅम झाल्यामुळे बऱ्याच वेळा त्यातून पादचाऱ्यांना वाट काढून चालणे मुश्किल होत आहे. त्यासुद्धा उन्हाचा त्रास होत आहे… तसेच तेथील व्यवसायावर सुद्धा परिणाम होत आहे
याचा संपूर्ण विचार करून नार्वेकर बेकरी ते बाजारपेठ या मार्गावरील एकदिशा मार्गाची अंमलबजावणी तत्काळ करावी.. अन्यथा मतदानावर बहिष्कार घालावा लागेल. याचीही नोंद घ्यावी, असे श्री. भोगटे यांनी म्हटले आहे.
निलेश जोशी, कोकण नाऊ, कुडाळ.