पाट हायस्कूलमध्ये डिजिटल क्लासरूमचे उद्घाटन

प्रतिनिधी । कुडाळ : एस .के. पाटील शिक्षण प्रसारक मंडळ पाट पंचक्रोशी पाट एस एल देसाई विद्यालय व कै.एस आर पाटील कनिष्ठ महाविद्यालय तथा कै. डॉ. विलासराव देसाई कला, वाणिज्य आणि विज्ञान उच्च महाविद्यालय, इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये Indoco कंपनीचे एच आर. मॅनेजर करुणकर बिसोई व सीनियर एक्झिक्युटिव्ह ऍडमिनिस्ट्रेटर तथा राज्यपाल कोशारी यांच्या हस्ते समाजरत्न पुरस्काराने सन्मानित असे अरविंद प्रभू आणि जेष्ठ प्राध्यापक महादेव टीक्का यांच्या हस्ते डिजिटल तीन वर्ग खोल्यांचा उद्घाटन समारंभ मोठ्या थाटात पार पडला.
अरविंद प्रभू करुणकर बिसोई ,अमित मांडवकर, समीर फाटक ,मंदार प्रभू या सर्व मान्यवरांचा संस्था सचिव सुधीर ठाकूर व संस्था सदस्य राजेश सामंत, मुख्याध्यापक शामराव कोरे यांच्या हस्ते शाल ,श्रीफळ देऊन संस्था व विद्यालयातर्फे सत्कार करण्यात आला. आमच्या शिक्षण संस्थेचा फार मोठी झेप घेण्याचा हा काळ आहे. शिक्षक तंत्रज्ञानात प्रगत झाले तर शिक्षण क्षेत्राचा विकास होईल. कौशल्य विकासावर आधारित व्यवसाय करा. डिजिटल क्लासरूमच्या रूपाने नवीन शैक्षणिक दालन सुरू केले आहे. त्याचा विद्यार्थ्यांनी उपयोग करावा असा मौलिक संदेश संस्था सचिव सुधीर ठाकूर यांनी विद्यार्थ्यांना दिला.
या डिजिटल शिक्षणाचा विद्यार्थी लाभ घेतील असे मनोगत इंडोकोचे HR करूणकर बिसोई यांनी आपल्या भाषणात व्यक्त केले .C S R फंडच्या माध्यमातून डिजिटल क्षेत्रात अग्रेसर होण्यासाठी इंडोको कंपनीचे करुणकर बिसोई, अरविंद प्रभू यांचे खूप मोलाचे सहकार्य लाभले. इंडोको कंपनी मार्फत वसतिगृहासाठी मदत, दोन लाख रुपयांच्या वह्यावाटप ,केळूस विद्यालय, आमचे पाट हायस्कूल अशा विविध प्रकारे सामाजिक कार्य करण्याचा अरविंद प्रभू यांचा पिंड आहे. अशा शब्दात संस्था सदस्य राजेश सामंत यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
संयम ठेवा, स्वप्न पूर्तता होतेच .या पाट हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी यूपीएससी परीक्षेत यश मिळवले तर मी त्या विद्यार्थ्यांचा न भूतो न भविष्यति असा सत्कार करेन. आय.पी.एस, आय.ए.एस अधिकारी या शाळेत आणून त्यांचे अनुभव तुम्ही ऐकले पाहिजे असे मला वाटते. उच्चतुल्य माणसांच्या पदस्पर्शाने आपली भूमि पुनीत होईल. संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शाळा डिजिटल करून सर्व गोष्टींचा लाभ पुढच्या पिढीला घेता येईल असा माझा मानस आहे. असे अरविंद प्रभू यांनी सांगितले. ज्या गोष्टीत आवड आहे त्यामध्ये बेस्ट ऑफ बेस्ट करायचे. सक्सेस तुमच्या पायाशी असेल .असा संदेशही त्यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना दिला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत मुख्याध्यापक शामराव कोरे, सूत्रसंचालन शिक्षक प्रतिनिधी संदीप साळसकर व आभार पर्यवेक्षक राजन हंजनकर यांनी मानले.
प्रतिनिधी, कोकण नाऊ, कुडाळ.