सिंधुकेअर हॉस्पिटलचा शानदार शुभारंभ

अत्याधुनिक सुविधांसह रुग्णांच्या सेवेसाठी सज्ज
श्रीमती शर्मिला परुळेकर यांच्या हस्ते उदघाटन
काळजी, उपचार, करुणा हे ब्रीद घेऊन वाटचाल सुरु
निलेश जोशी । कुडाळ : सिंधुदुर्गातील ट्रॉमा केअर सेंटर असलेल्या आणि अत्याधुनिक उपकरणासह रुग्णसेवेसाठी सज्ज असलेल्या डॉ मकरंद परुळेकर आणि डॉ गौरी परुळेकर यांच्या सिंधूकेअर हॉस्पिटलचे आज शानदार उद्धाटन झाले. डॉ परुळेकर यांच्या आई श्रीमती शर्मिला शामसुंदर परुळेकर यांच्या हस्ते फीत कापून या हॉस्पिटलचा शुभारंभ मोठ्या थाटात संपन्न झाला. यावेळी विविध क्षेत्रातील उपस्थित होते.
माहिती तंत्रज्ञानाच्या युगात वाटचाल करताना सातत्यपूर्ण नावीन्यपूर्ण बदल घडत असतात या बदलांना आपल्याला सामोरे जावे लागते. सर्वच क्षेत्रात बदल होत असताना वैद्यकीय क्षेत्रातही हे बदल झपाट्याने दिसून येत आहेत. कोणताही अपघात झाला की येथील शासकीय व खाजगी रुग्णालयात उपचारासाठी रुग्ण आणले जातात. त्यांच्यावर उपचार केले जातात. मात्र पुढील उपचारासाठी गोवा बांबुळी हे वाक्य गेली बरीच वर्षे असून हे कुठेतरी थांबले पाहिजे या उदात्त हेतूने डॉ मकरंद परुळेकर यांनी आपल्या सिंधू केअर हॉस्पिटल मध्ये अत्याधुनिक उपकरणे असणारे ट्रामा केअर सेंटर सुरू केले आहे. हे केल्यामुळे हे सिंधूकेअर हॉस्पिटल आता गोव्याला पर्याय ठरणार आहे असेच म्हणावे लागेल.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुंबई गोवा महामार्गावर रिलायन्स पेट्रोल पंप नजीक डॉ मकरंद परुळेकर व स्त्री रोग तज्ञ डॉ गौरी परुळेकर यांचे भव्य देखणे सिंधू केअर हॉस्पिटल आज रुग्णसेवेत सज्ज झाले आहे. त्याचा उद्घाटन सोहळा डॉ मकरंद परुळेकर यांच्या आई श्रीमती शर्मिला शामसुंदर परुळेकर यांच्या शुभहस्ते विविध क्षेत्रातील मान्यवर यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
गेली बरीच वर्षे आपण वृत्तपत्रात दुचाकी चारचाकी वाहनांत अपघात झाला. यामध्ये जखमी झालेल्या रुग्णांना जिल्हयातील खाजगी व शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले जाते. तिथे नुसते दाखल केल्यानंतर शेवटचा पर्याय सबंधित रुग्णाला पुढील उपचारासाठी गोव्याला हलविण्यात आले, असे बरीच वर्षे वृत्तपत्रातून वाचण्यात आले. यासाठी सिंधुदूर्ग जिल्ह्यात ट्रॉमा केअर सेंटर सेवा सुरू करावी या उदात्त हेतूने सिंधूकेअर हॉस्पिटल सुरू करण्यात आले आहे.
काळजी, उपचार,करुणा हे ब्रीद घेऊन हे सिंधूकेअर हॉस्पिटल रुग्णसेवेसाठी सज्ज झाले आहे. आज सकाळी हॉस्पिटलमधे पुरोहितांच्या उपस्थितीत धार्मिक विधी पार पडले. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी एम एस (ऑर्थो मुंबई) कन्सल्टिंग ऑर्थोपेडिक सर्जन डॉ मकरंद परुळेकर, एम एस डी एन बी( मुंबई)स्त्री रोगतज्ञ सोनोलॉजिस्ट डॉ गौरी परुळेकर, डीए (मुंबई) इंटेसिविस्ट डॉ वादीराज सवदत्ती, एम डी (पथोलॉजीस्ट) डॉ संजय सावंत, डीसी एच (मुंबई )बालरोग तज्ञ डॉ अमोघ चुबे, एम डी (डायलिसिस, मुंबई) डॉ संजीव आकेरकर, बीपीटी (फिजिओ पुणे) डॉ आकांक्षा गावडे, डॉ उर्मिला तरवडे (पुणे) मंदार परुळेकर, सौ मौसमी परूळेकर, डॉ संजय निगुडकर, डॉ अमोल पावसकर, डॉ राजेश नवांगूळ, डॉ वैजनाथ रहाटे, डॉ रावराणे, देवदत्त चूबे, अमित सामंत, विठ्ठल पाटणकर, विशाल देसाई, प्रतिभा पाटणकर, डॉ श्वेता सवदत्ती, डॉ वीणा कुलकर्णी, डॉ प्रमोद सवदत्ती, डॉ मुक्तानंद गवंडळकर, तसेच सिंधुदूर्ग जिल्ह्यासह राज्यातील डॉक्टर्स, विविध क्षेत्रातील मान्यवर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी डॉ मकरंद परुळेकर यांचे वडील डॉ शामसुंदर परुळेकर यांच्या सिंधूकेअर हॉस्पिटलमध्ये लावण्यात आलेल्या फोटोप्रतिमेचे अनावरण डॉ परुळेकर यांच्या हस्ते करण्यात आले.
निलेश जोशी, कोकण नाऊ, कुडाळ.