‘चिमणी पाखरं’ चा नृत्य सन्मान सोहळा थाटात संपन्न

वर्षा वैद्य यांना पहिला जीवन गौरव पुरस्कार प्रदान

२८८ कलाकार आणि ३० गृपना पुरस्कार वितरित

निलेश जोशी । कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्हयातला नृत्य क्षेत्रातला पहिलाच पुरस्कार वितरण सोहळा शुक्रवारी सायंकाळी कुडाळच्या मराठा समाज सभागृहात मोठ्यात थाटात संपन्न झाला. कुडाळच्या चिमणी पाखरं डान्स ऍकॅडमीमार्फत या नृत्य सन्मान सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होत. रंगकर्मी वर्षा वैद्य यांना सर्वोच्च असा जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. इतर अनेक विभागात सुमारे ६०० जणांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व नामांकित नृत्य कलाकार, नृत्य दिग्दर्शक, निवेदक, रंगमंच व्यवस्था करणारे बॅक स्टेज आर्टिस्ट, नृत्य कार्यक्रम आयोजक या सर्वाना एकाच ठिकाणी आणून त्यांचा नृत्य सन्मान पूरसाकाराने गौरव करावा असा या कार्यक्रमामागचा उद्देश होता. चिमणी पाखर डान्स ऍकॅडेमीचे अध्यक्ष रवी कुडाळकर आणि सल्लागार सुनील भोगटे यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम साकार झाला. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विविध भागातून आलेले कलाकार आणि रसिक प्रेक्षक यांनी तुडुंब भरलेल्या कुडाळच्या मराठा समाज सभागृहात शुक्रवारी सायंकाळी या कार्यक्रमाला सुरुवात झाली. कार्यक्रमाचे उदघाटन मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून आणि ज्येष्ठ पत्रकार शेखर सामंत यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर शेखर सामंत यांच्यासह रंगकर्मी केदार सामंत, केदार देसाई, साईनाथ जळवी, प्रणय तेली, अनंत जामसंडेकर, श्री. नाईक, श्री. पावसकर, चिमणी पाखरंचे सल्लागार सुनील भोगटे, अध्यक्ष रवी कुडाळकर उपस्थित होते.
यावेळी बोलताना शेखर सामंत यांनी चिमणी पाखरं डान्स अकादमीच्या या उपक्रमाचं कौतुक केलं. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नृत्य क्षेत्रातील कलाकाराणा एकत्रित करून त्यांचा सन्मान करण्याची चिमणी पाखरं संस्थेची हि संकल्पना खुरूप चांगली असल्याचे श्री. सामंत म्हणाले. पुढच्या वर्षी या पुरस्कार सोहळ्याचे स्वरूप थोडे वेगळे असेल असे सुनील भोगटे यांनी सांगितले. यंदा तब्बल सहाशे कलाकारांनी नोंदणी केली होती. पण पुढच्यावर्षी नॉमिनेशन पद्धत राबवण्यात येऊन ज्युरी द्वारे कलाकार निवडण्यात येतील असे श्री. भोगटे यांनी सांगितले. यावेळी प्रणय तेली, केदार सामंत, केदार देसाई,अनंत जामसंडेकर, साईनाथ जळवी यांनी देखील आपले विचार व्यक्त करून या कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. या उदघाटन सोहळ्याचे सूत्रसंचालन रवी कुडाळकर यांनी केले.
त्यांनतर सुप्रसिद्ध निवेदक निलेश गुरव आणि शुभम धुरी यांनी पुरस्कार वितरण सोहळ्याची सर्व सूत्र आपल्या हाती घेत कार्यक्रमाला सुरुवात केली. चिमणी पाखरं डान्स अकादमीच्या कलाकारांनी सुदंर असे गणेश स्तवन नृत्य सादर केल्यावर प्रत्यक्ष पुरस्कार वितरण सोहळ्याला सुरुवात झाली. इकून सहा विभागामध्ये हे पुरस्कार देण्यात आले. यावर्षीचा जीवन गौरव पुरस्कार सुप्रसिद्ध रंगकर्मी वर्षा वैद्य याना प्रसिद्ध दिग्दर्शक सुहास वरुणकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्यांनतर नृत्य कार्यक्रम निवेदक पुरस्कार, युवक युवती नृत्य कलाकार, उभारते नृत्य कलाकार,, नृत्य दिग्दर्शक, रंगमंच व्यवस्था करणारे बॅक स्टेज आर्टिस्ट, नृत्य कार्यक्रम आयोजक अशा विभागात वैयक्तीक २८८ पुरस्कार तर ३० नृत्य गृप अशा सुमारे ६०० हुन अधिक नृत्य कलाकारांना यावेळी मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
अगदी एखाद्या मोठ्या अवॉर्ड शो सारखा अतिशय नेत्रदीपक असा सोहळा संपन्न झाला. जणू जिल्हयांतील नृत्याशी संबंधित कलाकारांचे संमेलनच जणू भरले होते. सिंधुदुर्ग जिल्ह्याचंय कानाकोपऱ्यातून कलाकार उपस्थित होते. त्यांना तितकीच सुंदर दाद रसिकांकडून मिळत होती. म्हणूनच एका सुंदर आणि नीटनेटक्या कार्यक्रमाच्या आठवणी मनात साठवून रसिकांनी घर गाठले असेल यात शंका नाही.

निलेश जोशी, कोकण नाऊ, कुडाळ.

error: Content is protected !!