खारेपाटण बाजारपेठ रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण कामाचे शुभारंभ संपन्न
माजी जि.प.अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत यांच्या हस्ते झाले भूमिपूजन
खारेपाटण शिवाजीपेठ ( खारेपाटण बाजारपेठ )येथील रस्त्याचे काम गेले खूप वर्ष प्रलंबित होते. विविध पक्षाची सरकारे बदलली मात्र खारेपाटण बाजारपेठेतील रस्ता जश्याचा तसा बिकट अवस्थेत होता.अखेर खारेपाटण बाजारपेठ येथील मुख्य रस्त्याला भाजपा आमदार नितेश राणे यांच्या प्रयत्नाने महाराष्ट्र शासनाच्या बजेट मधून १६ लाख ९७ एवढा मोठा निधी मंजूर झाला असून नुकतेच या रस्त्याच्या खडीकरण व डांबरीकरण कामाचा शुभारंभ आज शुक्रवारी सकाळी ११.३० वाजता सिंधुदुर्ग जि.प.माजी अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांच्याच शूभहस्ते खारेपाटण एस टी बस स्थानक येथे श्रीफळ वाढवून करण्यात आला.
खारेपाटण बाजारपेठेतील रस्ता पूर्णतः मातीमय धुळ्युक्त झाला असून पावसाळ्यात तर नागरिकांना पाण्या बरोबरच चिखलाचा सामना करावा लागत होता.व्यापारी व ग्रामस्थ सातत्याने या रस्ता डांबरीकरण करण्यासाठी पाठपुरावा करत होते.अखेर भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून व केंद्रीय मंत्री नारायणराव राणे व पालक मंत्री रवींद्र चव्हाण तसेच स्थानिक भजपा आमदार नितेश राणे व माजी जि.प. अध्यक्ष संदेश सावंत व सदस्य रवींद्र उर्फ बाळा जठार यांच्या प्रयत्नातून हा रस्ता मंजूर झाला असून लवकरच या रस्त्याच्या खडीकरण व डांबीकरण कामाला सुरवात करण्यात येणार आहे.
खारेपाटण बाजारपेठ रस्ता कामाच्या शुभारंभप्रसंगी खारेपाटण जि.प.मतदार संघाचे माजी सदस्य तथा बांधकाम व वित्त सभापती रविंद्र उर्फ बाळा जठार,माजी पं.स.सदस्य, कणकवली पं.स.माजी सभापती दिलीप तळेकर,सौ तृप्ती माळवदे, खारेपाटण सरपंच सौ.प्राची ईसवलकर,उपसरपंच महेंद्र गुरव, माजी सरपंच किशोर माळवदे,वीरेंद्र चिके,माजी उपसरपंच इस्माईल मुकादम,भाजप शक्ती केंद्र प्रमुख सूर्यकांत भालेकर,भाऊ राणे,सुधीर कुबल राजेंद्र वरुणकर,ग्रा.पं.सदस्य गुरूप्रसाद शिंदे,किरण कर्ले,जयदीप देसाई, सुधाकर ढेकणे,सौ मानली होनाळे, शीतिजा धुमाळे,अमिषा गुरव,अस्ताली पवार,खारेपाटण व्यापारी असो.चे अध्यक्ष प्राजल कुबल,मंगेश गुरव,अरुण कर्ले, अशोक पाटील आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
दरम्यान खारेपाटण बाजारपेठ येथील रस्ता खारेपाटण एस टी बसस्थानक ते खारेपाटण घोडेपाथर बंदर ते पुढे सम्यक नगर खारेपाटण पर्यंत खडीकरण व डांबरीकरण करण्यात येणार आहे.तर खारेपाटण ग्रामस्थ आणि व्यापारी यांनी मंजूर झालेल्या रस्त्याच्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले.
अस्मिता गिडाळे, खारेपाटण