कोकणातील काजू शेतकऱ्यांना 2 टनापर्यंत अनुदान मिळणार

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

माजी आमदार प्रमोद जठार यांची कणकवलीत माहिती

आमदार नितेश राणे व माजी आमदार प्रमोद जठार यांनी केला होता पाठपुरावा

शिवसेना भास्कर जाधव हेच मोठे गुंड आहेत. गुंडगिरी सांगत शिवसेनेने २५ वर्षे कोकणची फूकट घालवली. राज्याचे मुख्यमंत्री पद अडिज वर्षे होते कोकणात काय केलात ? कोकणातील बेरोजगार युवकाला एक तरी रोजगार दिलात काय? खासदारांनी गेल्या १० वर्षात काय केले?विनायक राऊत यांनी लेखा जोगा जाहीर केला.त्यात बीएसएनएल च्या टॉवरचे नारळ फोडले त्याचे फोटो सोडून काहीच नाही.त्यामुळे जनता आता महायुतीचा खासदार लोकसभेत पाठवणार असा विश्वास माजी आमदार प्रमोद जठार यांनी व्यक्त केला.काजू उत्पादक शेतकऱ्यांना एक महिन्यात खात्यावर अनुदान मिळणार असल्याचे श्री.जठार यांनी सांगितले.
कणकवली येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी बबलू सावंत ,राजू पवार,सदानंद चव्हाण,शिशिर परुळेकर,संतोष पुजारे आदी मान्यवर उपस्थित होते. केंद्र सरकारचा ५० लाख कोटी रुपयांचे बजेट आहे. आम्ही रोजगार निर्माण करणारा ३ लाख कोटींचा रिफायनरी प्रकल्प खेचून आणला आहे.खासदारांनी गेल्या १० वर्षात किती लाख कोटी रुपये जिल्ह्यात आणले.बाप दाखवा नाहीतर श्राद्ध घाला.किती मोठे प्रकल्प आणलात,२०१७ आम्ही रिफायनरी आणली. त्याला विरोध करत राऊतानी पुढची ही वर्षे काढली. आता वकृत्व, दातृत्व असलेला खासदार दिल्लीत पाठवला पाहिजे.तरच जनतेचे प्रश्न मिटतील.ताकदीचा माहायुतीचा खासदार लोकसभेत जाणार आहे,राऊत यांचा पराभव अटळ असल्याचे श्री.जठार यांनी सांगितले
कालच्या सभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काजू उत्पादक शेतकऱ्यांना सुरुवात म्हणून दोन टनापर्यंत १० रुपये प्रति दराचे अनुदान जाहीर केले आहे.सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील दीड लाख शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल.सातबारा वर पिक पाहणी नोंद आहे,त्यांना पैसे मिळणार आहेत.थेट शेतकऱ्यांना किमान २० हजार रुपये मिळणार आहेत.३०० कोटी रुपये काजू उत्पादक शेतकऱ्यांना देण्यासाठी काजू बोर्डाच्या खात्यावर पैसे जमा होतील.त्यानंतर शेतकऱ्यांना वाटप केलं जाईल.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री अजितदादा पवार ,देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानतो. हा ऐतिहासिक निर्णय सरकारने घेतला आहे.शेतकऱ्यांपर्यंत थेट पैसे मिळणार आहे.कांदा उत्पादक शेतकऱ्यांना जसे अनुदान दिले गेले,त्या धर्तीवर हा निर्णय घेतला आहे.सरकारने आता लेखा शीर्ष उघडले आहे.अनुदान एकदा सुरु झाले त्यामुळे पुढील वर्षी दमदुप्पट मागता येईल. हा शेतकऱ्यांचा विजय आहे,आ.नितेश राणे आणि मी हा विषय लावून धरला.त्यानंतर पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी मंत्रिमंडळ बैठकीत आवाज उठवला.त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला.जर ना.दीपक केसरकर यांनी १३५ किलो दर देण्याचे सांगितले असले तरी हा मार्ग लाँग टर्मचा आहे,तो पुढल्या वर्षी होईल.पण आताचा मार्ग हाच असेल.तोपर्यंत काजू बी खरेदी विक्री करणारी शासन यंत्रणा उभी करेल,असेही श्री.जठार यांनी सांगितले.

कणकवली, प्रतिनिधी

error: Content is protected !!